Sanjay Raut On Kirit Somaiya: '...यांची मुलं चणे फुटाणे विकतात का?' किरीट सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut On Kirit Somaiya: शिवसेना संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं किरीट सोमय्या यांनी केला होता.
Sanjay Raut On Kirit Somaiya: शिवसेना संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. किरीट सोमय्या कोण आहेत? मी आत्तापर्यंत कुणाच्याही कुटुंबावर बोललो नाही. पण त्यांनी खूप मोठी चूक केलीय. याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. मी यांच्या घरात घुसल्यास धरणी दुभंगेल आणि यांना सर्व नकोस होईल. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं. व्ययसाय करणं चुकीच आहे का? यांची मुले काही चणे फुटाणे विकतात का? असा सवाल संजय राऊत यांनी किरीट सोमय्यानी केलेल्या आरोपांना उत्तर देताना केलाय
नुकतीच संजय राऊत यांनी पणजी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाषण केलंय. तसेच किरीच सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर खोचक प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत म्हणाले की, " किरीट सोमय्या म्हणतायेत त्याप्रमाणे आमची जर एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी.
एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल, तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणं, चोऱ्या-माऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं कधीही चांगलंय. पण भाजपाचे लोकं जे काही म्हणत आहेत, अशा काही वायनरीज आमच्या कुटुंबाच्या असतील तर नक्कीच मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणतात.
"किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? भाजपा नेत्यांची मुलं केळी विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद आणि ढोकळा विकतो का? कुणाची मुलं काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची मुलं वांद्र्याच्या किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल टाकणार आहेत का? की डान्सबार टाकणार आहेत नाचवायला? भाजपाच्या लोकांनी हे धंदे बंद करावेत. महाराष्ट्रात भाजपाच्या लोकांनी जे घाणेरडं राजकार सुरू केलंय, ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही", असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
"महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कार, परंपरा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही घरादारापर्यंत, आमच्या मुलाबाळांपर्यंत जाता. तुमची मुलं काय करतात ते बघा. आमची मुलं तुमच्याप्रमाणे ड्रग्ज विकत नाहीत किंवा ड्रग्जच्या आहारी गेलेले नाहीत. कुणाची भागीदारी असेल, तरी सरकारनं ठरवलेलं धोरण त्या विशिष्ट व्यक्तीसाठी आहे का?
भाजपाच्या नेत्यांचे किती साखर कारखाने आणि वायनरीज आहेत ते पाहा", असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
- हे देखील वाचा-
- उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ गारठणार; पुढील 24 तास थंडीची लाट
- सिंधुदुर्गातील बांद्यात 89 जीवंत गावठी बॉम्ब जप्त, बंदुकीच्या नळ्यांसह रिकामी काडतुसेही सापडली
- नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha