राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात, ट्रक आणि कारची समोरासमोर धडक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात (Kiran Lahamte Car Accident) झाल्याची घटना घडली आहे.

Kiran Lahamte Car Accident : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात (Kiran Lahamte Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विठे घाटात झाला आहे. अकोले येथून राजूरकडे जाताना ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर लहामटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर आमदार लहामटे राजूर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले. कारण कारण आणि ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली होती. यामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
कोण आहेत किरण लहामटे?
आमदार डॉ. किरण लहामटे हे अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून त्यांचा आपल्या मतदारसंघात अफाट जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. दरम्यान, डॉ. किरण लहामटे हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळी फूट पडली त्यावेळी किरण लहामटे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्यांनी अजित पवार गटास पाठिंबा दर्शविला होता, पण अजित पवारांवर खोट्या कागदपत्रे केल्याचा आरोप करत आमदार किरण लहामटे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले होते. परंतु, आता त्यांनी पुन्हा अजित पवारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवत आपण त्यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या:























