एक्स्प्लोर

Raj Thackeray: अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत; वाचा काय म्हणाले राज ठाकरे...

Khupte Tithe Gupte: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई: पक्ष म्हटल्यावर चढ-उतार हे येतातच, माझ्यावर टीका करणारे अजित पवार हे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. ते अवधूत गुप्ते यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात बोलत होते. 

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. मिमिक्री करण्यावरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते काही इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत. मी माझा स्वतःचा पक्ष काढला होता, त्यामधून 13 आमदार निवडून आणले. पक्ष म्हटला की चढउतार हे येतातच. पण अजित पवार म्हणतात आता माझ्याकडे एकच आमदार आहे. अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संबंधावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खूप छान दिवस होते ते, माहित नाही मला कुणी विष कालवलं ते, किंवा कुणी नजर लावली ती. 

गेल्या चार वर्षात शिवसेनेच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या दोघांपैकी कोण शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं वाटतं असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाल की, दोघांपैकी कुणीही शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याचं वाटलं नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काही बाळासाहेबांचे स्वप्न नव्हतं. महाराष्ट्र बलशाली व्हावा हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होतं असं राज ठाकरे म्हणाले. 

केरळमध्ये 'केरला स्टोरी' या चित्रपटावर बंदी आणण्यात आली होती. चित्रपटावर बंदी आणणे यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला वाटतं की आपण लोकशाहीमध्ये राहतोय, पण ही वस्तुस्थिती नाही. झेंडा या चित्रपटामध्ये माझे कॅरेक्टर काहीसं निगेटिव्ह दाखवण्यात आलं होतं. पण मी त्याला विरोध केला नाही. पण आता चित्रपटांना विरोध केला जातोय. 

बारसू रिफायनरीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना बारसूचे पत्र हे उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, ते खालच्या माणसांवर ढकलून कसं चालेल? त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का त्या ठिकाणी कातळ शिल्प सापडली? इतकी हजारो एकर जमीन एका दिवसात खरेदी केली नसणार. कोकणातील माणसाकडून कवडीमोल जमीन घ्यायची आणि ती हजारोपटींनी सरकारला विकायची हा धंदा सुरू केला काहीजणांनी. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कशी काय लक्षात आली नाही? 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget