एक्स्प्लोर

Fadnavis-Thackeray Meet : अराजकीय गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थवर गेलो होतो, राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

Fadnavis-Thackeray Meet : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. मात्र "अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर गेलो होतो," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Fadnavis-Thackeray Meet : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये शिवतीर्थवर (Shivtirth) सोमवारी (29 मे) डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. त्यांची ही भेट तब्बल सव्वा तासांची होती. ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे चर्चांना देखील उधाण आलं आहे. मात्र "अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर गेलो होतो," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे राजकीय नेते भेटले आणि राजकारणावर चर्चा झालीच नाही, यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे. 

गप्पा मारायला बसू असं ठरलं होतं, काल तो मुहूर्त निघाला : देवेंद्र फडणवीस

राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थवर गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि काल तो मुहूर्त निघाला. असं ठरलं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीवर राजकीय विश्लेषकांचं मत काय?

राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं विश्लेषण केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मनसेला सोबत ठेवून एक चांगला पर्याय उपलब्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहेत, असं देशमुख म्हणाले. "दोन राजकारणी भेटतात तेव्हा त्यांच्यात अनौपचारिक गप्पा होऊच शकत नाही, त्यांच्यातील आपसूकच राजकारणाच्या होतात. अलिकडे राज ठाकरे वेगळी भूमिका घेत आहेत. राजकारणात समान विरोधक असला तर दोन भिन्न विचारसरणीचे लोक देखील एकत्र येतात. त्यातच भाजप आणि मनसेची जवळीक वाढायला लागलीय अशा बातम्या येऊ लागल्या. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करु लागले. राज ठाकरे यांनी थोडी वेगळी ओळख दाखवत वेगळी विधानं केली. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मनसेला सोबत ठेवून एक चांगला पर्याय उपलब्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहेत. त्याला छेद घेणारी भूमिका राज ठाकरे घेत आहेत असं दिसल्याबरोबर भाजप नेत्यांना असं वाटलं असावं की राज ठाकरे यांच्यासोबत संवाद वाढवणं गरजेचं आहे. कालच्या या भेटीकडे याच अर्थाने पाहिलं पाहिजे, असं रवीकिरण देशमुख म्हणाले.

कर्नाटक निकालानंतर राज ठाकरेंची भाजपवर टीका 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत होती. मात्र नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केली होती. ज्यांना वाटतं कोणीही आपला पराभव करु शकत नाही, त्यांनी या निकालातून धडा घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले होते. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान सव्वातासानंतर देवेंद्र फडणवीस हे आपला ताफ्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून रवाना झाले.

हेही वाचा

Devendra Fadnavis meets Raj Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget