एक्स्प्लोर
संघाच्या वर्गाला गैरहजर राहणाऱ्या खडसे, देशमुखांना नोटीस पाठवणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाने कार्यशाळेला अनुपस्थित राहिलेल्यांना नोटीस बजावली आहे.

नागपूर : नागपूरच्या रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजप आमदारांच्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना भाजप नोटीस बजावणार आहे. तशी माहिती आज नागपुरात पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह दिग्गज नेते रेशीमबागेत दाखल झाले. मात्र, यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि वेगळ्या विदर्भाचा नारा देणारे आशिष देशमुख मात्र गैरहजर होते. कोण कोण अनुपस्थित?
- एकनाथ खडसे (माजी महसूलमंत्री)
- रणजित पाटील (गृहराज्यमंत्री)
- आशिष देशमुख (आमदार)
आणखी वाचा























