![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
करुणा शर्मांना कोर्टात हजर करणार, अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा, करुणा यांचीही फिर्याद
काल करुणा शर्मा (karuna sharma) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना अंबाजोगाई कोर्टात नेण्यात येत आहे.
![करुणा शर्मांना कोर्टात हजर करणार, अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा, करुणा यांचीही फिर्याद Karuna Sharma to be produced in court, atrocity and pistol found in car in parli beed करुणा शर्मांना कोर्टात हजर करणार, अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा, करुणा यांचीही फिर्याद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/05/9407a656f0e4a41844991cda856be3dc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. काल करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना अंबाजोगाई कोर्टात नेण्यात येत आहे.
Karuna Sharma | करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?
काल करुणा शर्मा यांनी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून शर्मासह मोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहनात पिस्तुल सापडल्याच्या आधारावर गाडी चालक दिलीप पंडित अंदेरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरासमोर जमा झालेल्या जमावावर कोरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे करुणा यांच्या फिर्यादीवरून जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता करुणा शर्मा यांना परळी शहर पोलीस ठाण्यातून न्यायालयात अंबाजोगाईला घेवून जात असल्याची माहिती आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक आर राजा यांनी सांगितलं की, त्यांच्या गाडीत पिस्टल कोणी ठेवलं याची चौकशी चालू आहे. आम्ही त्यांना मंदिराकडे जाऊ नका असे सांगितले होते. मात्र त्या गेल्या. मंदिरासमोर जमा झालेल्या जमावावर कॉरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं एसपी आर राजा यांनी सांगितलं. करुणा शर्मा यांना 149 अन्वये नोटीस देण्यात आली आहे.. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही विधान करू नये, असं या नोटिशीत म्हटलं आहे.
माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का? : करुणा शर्मा
वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा शर्मा पोहोचल्या. मात्र, या ठिकाणी आमच्या साहेबांना बदनाम करायला आलात काय? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा शर्मा यांनी माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. यामुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)