एक्स्प्लोर

Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना

अत्यंत स्मित हास्य करत राज ठाकरे यांनी युती केल्याच जाहीर केलं. मात्र, मुंबईमध्ये कोण किती जागा लढवणार हे आम्ही आता सांगणार नाही, असे सांगत भाजपला प्रत्यक्ष टोला लगावला.

Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी एका मुलाखतीमध्ये म्हणालो होतो आणि त्या मुलाखतीपासूनच आम्ही एकत्र येण्याला सुरुवात झाली. आज मुंबईसाठी शिवसेना आणि मनसे युती झाल्याचे जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज आणि उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी अत्यंत स्मित हास्य करत राज ठाकरे यांनी युती केल्याच जाहीर केलं. मात्र, मुंबईमध्ये कोण किती जागा लढवणार हे आम्ही आता सांगणार नाही, असे सांगत भाजपला प्रत्यक्ष टोला लगावला. राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्त अॅड झाल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात, असा टोलाही राज यांनी लगावला.  मुंबईमध्ये मराठी आणि आमचाच महापौर होणार असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. बाकी जे बोलायचं ते आम्ही जाहीर सभांमधूनच बोलू, माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला सुद्धा इशारा दिला. 

मुंबईचा महापौर मराठीच होणार 

राज ठाकरे म्हणाले की, बरेच दिवस ज्या क्षणाची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करत आहोत. जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते कळवलं जाईल. मुंबईच्या महापौरपदाबद्दल त्यांनी सांगितले की, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार आहे. ज्यांचं मुंबई मुंबईवर, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा, असे भावनिक आवाहन त्यांनी केलं. 

परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईचे लचके तोडायचे आहेत, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी दोघेजण दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे हे मनसुबे आहेत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रवर कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रपासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असा इशाराच उद्धव यांनी दिला. ते म्हणाले की, मराठी माणसाला आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की, आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे, अशी भावनिद साद त्यांनी घातली. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Embed widget