एक्स्प्लोर

करुणा शर्मा लवकरच राजकारणात सक्रिय?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन पार्टनर असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

मुंबई : धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करुणा शर्मा यांनी आज महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.

"मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. 25 वर्ष मी घरात होते. आता 2 ते 3 महिने झाले घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे. पण करावं लागलं तर नक्की करेन. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन आज महापालिकेत आले होते. मी समाजसेविका आहे. राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

करुणा शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात, त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही आता निवेदन दिले आहे. सध्या इंटरनेटवर खूप वाईट व्हिडीओ वायरल होत आहेत. काही साईट या अश्लीलता पसरवतात. फेसबुकवर सुद्धा काही व्हिडीओ पॉप अप होतात. ते बंद व्हावं," अशी मागणी केली आहे. 

"मी 25 वर्षे कधीच घराबाहेर पडले नाही. गेल्या 2 महिन्यांपासून मी घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे," असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं.

वेळ येईल तेव्हा पुराव्यसह बोलेन : करुणा शर्मा
"माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींविषयी केस सुरु असल्याने बोलण्यास कोर्टाने मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी पुराव्यासह बोलेन. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार होते. पण मरण्यापेक्षा मी लढणं पसंत केलं. माझ्या मुद्यावर पण मी लवकरच बोलणार आहे. त्याचा निकाल लागला की मी बोलणार आहे. 100 टक्के सगळ्या गोष्टी सांगेन आणि पूर्ण पुराव्यासह सांगेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे," असं करुणा शर्मा यांनी नमूद केलं. 

लोकांच्या आणि स्वत:च्या न्यायासाठी लढणार : करुणा शर्मा
इथून पुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचं देखील करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. पूजा चव्हाण असेल किंवा आज नवी मुंबईतील एका मुलीला मारुन टाकल्याचा मुद्दा आहे. काही बाबी मीडियासमोर येत नाहीत, अशा महिलांची परिस्थिती खूप वाईट आहे. मी स्वतः पण आत्महत्या करणार होते. पण मग मी विचार केला की असंच मरण्यापेक्षा लोकांसाठी काही तरी करुन मरु. मी लोकांना पण न्याय मिळवून देईन आणि स्वतःसाठी पण न्याय मिळवण्यासाठी मी लढणार आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget