Jejuri News : अखेर जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तपदी 6 जेजुरी ग्रामस्थ अन् बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार
Jejuri News जेजुरीतील ग्रामस्थांच्या खंडोबा देवाच्या देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलनाला यश आलं आहे. मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 होणार आहे.
![Jejuri News : अखेर जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तपदी 6 जेजुरी ग्रामस्थ अन् बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार jejuri news jejuri villafers protest number of Martand Devasthan trustees member will be increased from 7 to 11 decision by Charity Commissioner Jejuri News : अखेर जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तपदी 6 जेजुरी ग्रामस्थ अन् बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/9c83eb1f53274870ab4ac28a8bc19b9b1686133528886442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jejuri News : जेजुरीतील ग्रामस्थांच्या (Jejuri News) खंडोबा देवाच्या देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलनाला यश आलं आहे. मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 होणार आहे. जेजुरी ग्रामस्थ 6 आणि बाहेरचे 5 असे एकूण 11 विश्वस्तांची नियुक्ती होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत निर्णय घेण्यात आला आहे. घटना दुरुस्ती करुन पुन्हा एकदा सोमवारी अंतिम सुनावणी होणार असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे.
मागील 12 दिवसांपासून जेजुरीतील ग्रामस्थांचं खंडोबा देवाच्या देवस्थानमध्ये नेमलेल्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलन सुरु होतं. आज कीर्तन करुन आंदोलन करण्यात आलं होतं. जेजुरी ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे जेजुरीतील मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त निवडीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्याचा ही ठराव धर्मादाय आयुक्तांकडे देण्यात आला होता. जर मागणी आज मान्य झाली नाहीतर सोमवारपासून जेजुरीत बंदची हाक देऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. अखेर धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 करण्यात आली आहे.
संविस्तर बातमी थोड्यावेळात...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)