अमेरिकेतसुद्धा पुतळा पडला होता, ही नैसर्गिक घटना, मग आपटेंवर गुन्हा कसा? वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
दबावाखाली FIR नोंदवली आहे. वर्क ऑर्डरची कॉपी मिळावी म्हणून पोलीस कोठडी मागत आहेत. ही नैसर्गिक घटना आणि गुन्हा कसा दाखल केला? असा युक्तिवाद जयदीप आपटेच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) आणि बांधकाम रचना सल्लागार चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात दोघांना कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टात आरोपीचे वकील गणेश सोवनी यांनी कोर्टात बाजू मांडली. पुतळा कोसळल्याची घटना नैसर्गिक आहे. त्यामुळे जयदीपवर गुन्हा कसा दाखल केला? तसेच दबावाखाली FIR नोंदवली आहे, असा युक्तिवाद आपटेंच्या वकिलांनी मालवण दिवाणी न्यायालयात केला.
राजकोट पुतळा कोसळ्याप्रकरणाची सुनावणी मालवण दिवाणी न्यायालयात न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारच्यावतीने सरकारी वकील तुषार भनगे तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनी युक्तिवाद केला. या वेळी चेतन पाटीलचे नातेवाईक उपस्थित होते.
ही नैसर्गिक घटना आणि गुन्हा कसा दाखल केला? आपटेच्या वकिलांचा दावा
जयदीप आपटेच्या बजावासाठी युक्तिवाद करताना गणेश सोवनी म्हणाले, पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला होता त्या ठिकाणी वारे वेगाने वाहत होते. निविदा योग्य प्रकारे पूर्ण झाली. आमच्या अशीलाच्या कंपनीला काम दिले गेले होते. त्यासाठी 2.44 कोटी दिले होते. पुतळा उभारताना ज्या ठिकाणी जोड दिलेला त्या जागी गंज लागला होता. महाराजांचा पुतळा ब्राँझचा होता. उज्जैनला देखील असाच पुतळा कोसळला होता. मात्र जयदीप आपटेंवर थेट गुन्हा दाखल केला गेला. पुतळा पडला तेव्हा पर्यटक इथे नव्हते. Fir मध्ये कुणालाही इजा झाल्याची नोंद नाही. त्यानुसार कुठले यातील कुठंही कलम लागू होत नाही. पुतळा पडावा असा उद्देश नव्हता. नटबोल्ड बाहेरून दिसू शकत नाहीत. पुतळा पोकळ होता. अमेरिकेतसुद्धा राष्ट्रपती पुतळा पडला होता. पर्यटकांना सहज नटबोल्ड दिसू शकत नाहीत. दबावाखाली FIR नोंदवली आहे. वर्क ऑर्डरची कॉपी मिळावी म्हणून पोलीस कोठडी मागत आहेत. ही नैसर्गिक घटना आणि गुन्हा कसा दाखल केला? 10 तासात Fir दाखल केली आहे.
पुतळा कुठे झाला याची चौकशी करायची आहे, सरकारी वकिलांचा दावा
राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी तपास होणे गरजेचे आहे. कारण पार्ट कुठे तयार केले याचा तपास करायचा आहे. दोघांनी एकत्र काम केले. त्यामुळे पोलीस कोठडी आवश्यक आहे. तसेच आरोपीचा मोबाईल लॅपटॉप ताब्यात घ्यायचा आहे. केस प्राथमिक टप्प्यात असल्याने 10 दिवस पोलिस कोठडी आवश्यक आहे, असे सरकारी वकील म्हणाले.
हे ही वाचा :
जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप