एक्स्प्लोर

जनतेच्या रचनात्मक टीका विरोधकांना सहन होईनात, मंत्री जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील शब्दांत टीका व ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केलीय. यावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : जनता भाजप नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहीये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये, अशा शब्दात मंत्री आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना उत्तर दिलंय. भाजप नेत्यांवर ट्रोलिंग होते म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी काल पोलिसांत तक्रार केली आहे. यावरुन जयंत पाटलांनी सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का? असा सवाल केला आहे. भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्यावरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे. गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती. त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टिका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये, असंही पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यात शेवटी पाटील यांनी जागतिक हास्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा, असं त्यांनी म्हटलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील शब्दांत टीका व ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांनी काल मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांचं एक शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटलं. यावेळी बोलत असताना आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील असंही दरेकर म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
Embed widget