(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar : जय पवार बारामतीमध्ये फिरण्याऐवजी कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले, एजन्सीला 200 कोटी दिले आहे ते गंडलेलं दिसतं; रोहित पवारांची खोचक टीका
एजन्सी सांगेल तसा पण ऐकायला गेलो तर गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकारणामुळे आपण काय केला असाही प्रश्न सामान्य लोक विचारायला लागले आहेत, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
Rohit Pawar : भाजप आमदार नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार एकाच दिवशी कर्जतमध्ये येत असल्याने आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दात टीका करताना सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, आज योगायोग म्हणजे आमदार नितेश राणे सुद्धा कर्जतमध्ये आहेत आणि जय पवार सुद्धा कर्जतमध्ये आहे. सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. आणि त्या अनुषंगाने नितेश राणे कर्जत शहरामध्ये येत असतील आणि त्यावेळी जय पवार जर येत असतील तर मग असं म्हणावं लागेल की बीजेपी आणि अजित दादा या दोघांनी रोहित पवार मतदारसंघातून बाहेर गेले नाही पाहिजेत आणि मतदारसंघामध्ये अडकून पडले पाहिजेत असा निर्णय घेतलेला दिसतो.
अजितदादा तिथं उभं राहणार का नाही?
काही दिवसांपूर्वी अजितदादा बोलत असतानाच काही कार्यकर्ते त्यांना भेटले आणि दादा आता तुम्ही थांबा जय पवारना संधी द्या बोलून गेले. कार्यकर्ते म्हणत असतील तर विचार केला जाईल, असे दादा म्हणाले. दोन दिवसांनी जय पवार बारामतीमध्ये फिरण्याऐवजी कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले. आता त्यांच्या लेव्हला काय कंफ्युजन चाललं आहे हे आपल्याला बघावं लागेल. अजितदादा तिथं उभं राहणार का नाही? जयची चर्चा तिथे सुरू झाल्यानंतर अचानक दोन दिवसांनी जय पवार कर्जत जामखेडमध्ये येत आहेत.
दादांची वक्तव्ये सुद्धा चुकायला लागली आहेत
डिझाईन बॉक्स नावच्या एजन्सीला 200 कोटी रुपये दिले आहेत ते जरा गंडलेलं दिसत आहे. दादांची वक्तव्ये सुद्धा चुकायला लागली आहेत. निर्णयाच्या बाबतीत सुद्धा चुकायला लागलं आहे. त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? एजन्सी सांगेल तसा पण ऐकायला गेलो तर गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकारणामुळे आपण काय केला असाही प्रश्न सामान्य लोक विचारायला लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या