(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe : मतांची झाली कडकी, म्हणून बहीण झाली लाडकी; खासदार अमोल कोल्हेंचा बोचरा वार
बहिण विचारते ओवाळणी दिली, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय? बहीण विचारते भाच्याच्या नोकरी, लग्नाचं काय? मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशा शब्दात कोल्हे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.
Amol Kolhe : सगळ्या योजनांचे पैसे मतांची बेगमी करण्यासाठी वळतात का? बहिण विचारते ओवाळणी दिली, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय? बहीण विचारते भाच्याच्या नोकरी, लग्नाचं काय? मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवरूनही खोचक टोला लगावला.
आमदार जरी विकत घेता आले तरी महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही, हे सांगण्याची हीच ती वेळ!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 18, 2024
@Tanvi Official Post pic.twitter.com/UNDU9iVXaE
संस्था असणाऱ्यांनी शरद पवारांचे बोट सोडले, भले भले म्हणणारे सोडून गेले
अमोल कोल्हे म्हणाले की, आमच्या मतदारसंघांमध्ये गुलाबी यात्रा निघाली. मात्र, या गुलाबी यात्रेला भाजपचे नेते काळे झेंडे दाखवत आहेत. लाडकी बहीण कोणाची हेच कळेनासं झालं आहे. मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांची हेच कळेनासं झालं आहे. असेही अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे यांनी सांगितले की पक्षावर गेल्यावर्षी अनेक अडचणी आल्या. विशेष म्हणजे संस्था असणाऱ्यांनी शरद पवारांचे बोट सोडले, भले भले म्हणणारे सोडून गेले. संस्था असतील तर अडचणी येतात असे अनेक जण सांगत होते, पण राजेश टोपे साहेबांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. लोकसभा झांकी हे विधानसभा बाकी है असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रा (दिवस नववा)
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 17, 2024
📍जिंतूर, परभणी
मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, हे आता बहिणींनाही कळलंय. शिक्षकांची ६७ हजार पदे रिक्त आहेत, ५६ हजार शिक्षण सैवकांची पदे रिक्त आहेत. बहुजन समाजाच्या नोकऱ्यांवर सरकारने गदा आणली आहे. त्यात येणारे उद्योग गुजरातला जात आहेत, पण… pic.twitter.com/MC0mlBFeE5
कळून चुकलं आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार
अमोल कोल्हे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका पुढे टाकण्याचं कारस्थान रचले जाते. त्यांना कळून चुकलं आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या