एक्स्प्लोर

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये रेल्वे अपघातात नेमकं काय घडलं? प्रवाशानेच सांगितली थरकाप उडवणारी हकीकत!

Jalgaon Train Accident Update : जळगावमध्ये पुष्कप एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उडी घेतल्याने सहा ते आठ प्रवाशांचा समोरून येणाऱ्या रेल्वेखाली आले आहेत.

Jalgaon Pushpak Train Accident : जळगावमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट खाली उडी मारली. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्गैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती. जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. हे प्रवासी आग लागली आग लागली असं म्हणाले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेली. कापली गेली. आता नक्की किती प्रवाशांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

आग लागल्याचे कान पडताच उड्या मारल्या

आग लागली असं मेमकं कोण म्हणालं हे नेमकं सांगता येत नाही. मात्र आग लागल्याचे कानी पडताच प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या, असंही या प्रवाशाने सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले? 

या घटनेनंतर एबीपी माझाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बातचित केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सहा ते आठ प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडली गेली आहेत. तसेच दुर्घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय मदत पाठवली आहे. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता?

सध्यातरी या दुर्घटनेत नेमके किती प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या वैद्यकीय मदत, रेल्वे पोलीस, जळगाव जिल्ह्याचे पोलीस दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचली आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची जलगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दखल घेतली असून योग्य ती मदत आणि कार्यवाही करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे. 

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

Jalgaon Express Accident : आग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या, समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्प्रेसने अनेकांना चिरडले, जळगावमधील घटना

Beed : आम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख कुटुंबीयांची पंकजा मुंडेंकडे मागणी

Jalgaon Crime News: प्रेम विवाह केलेल्या पोटच्या मुलाला भर चौकात कोयत्याने हल्ला करुन संपवलं, आई-वडिलांनी टोहो फोडला

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
Embed widget