Jalgaon Crime News: प्रेम विवाह केलेल्या पोटच्या मुलाला भर चौकात कोयत्याने हल्ला करुन संपवलं, आई-वडिलांनी टोहो फोडला
Jalgaon Crime News: प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या माहेरच्या लोकांनी मुकेश शिरसाट या आपल्या जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना जळगाव शहरात पिंप्राळा हुडको भागात घडली होती.
जळगाव: जळगावमध्ये सैराट चित्रपटासारखी दुर्दैवी घटना घडली आहे (Jalgaon Crime News). पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीच्या कुटुंबियांनी भरदिवसा आपल्या जावयावर कोयता (Jalgaon Crime News)आणि चॉपरने वार करत त्याला ठार केल्याची घटना काल (19 जानेवारी) जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात (Jalgaon Crime News) घडली आहे. या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ (Mukesh Shirsat) या प्रेम विवाह केलेल्या तरुणाची हत्या झाली आहे. तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या माहेरच्या लोकांनी मुकेश शिरसाट या आपल्या जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना जळगाव शहरात पिंप्राळा हुडको भागात घडली होती.
या घटनेत आपल्या मुलाची हत्या होताना प्रत्यक्ष रित्या ज्यांनी पाहिले आहे असे मयत मुकेशच्या आई वडिलांंवर, त्याच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेम विवाह केला म्हणून आपल्या मुलावर मुलीच्या माहेरच्या लोकांच्यासह त्यांच्या नातेवाईक परिवाराची खुन्नस होती. यातूनच त्यांनी भर चौकात आपल्या मुलावर विळे, कोयत्याने हल्ला चढविला, यावेळी प्रत्येकाच्या हातात शस्त्र असल्याने आपण आपल्या मुलाला वाचू शकलो नाही,आपल्या डोळ्या देखत त्यांनी त्याच्यवर हल्ला करून मारले अशी हदयद्रावक घटना त्या मृत तरूणाच्या आई-वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली.
या घटने संदर्भात आपण अनेक वेळा पोलिसांच्याकडे तक्रार घेऊन गेलो आहोत, मात्र पोलिसांनी घरची भानगड म्हणून त्याची फारशी गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळेच आपल्या मुलाचा जीव गेला आहे. आपल्या सुनेचे आणि तिच्या लहान बाळाच्या आयुष्याच्या प्रश्न आता निर्माण झाला आहे. आमच्या कुटुंबाचं आयुष्य खराब करणाऱ्या या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी मयत मुकेश शिरसाटचे कुटुंबीय आता करत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगावमधील (Jalgaon Murder Case) पिंप्राळा हुडको परिसरातील गाढे चौकात राहणाऱ्या मुकेश शिरसाठने पूजा या तरुणीसोबत पाच वर्षांआधी प्रेम विवाह केला होता. हाच मनात राग ठेऊन (19 जानेवारी) मुकेश शिरसाठवर पूजाच्या कुटुंबियांनी हल्ला केला. पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने मुकेशच्या मानेवर वार केला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचविण्याचा करणाऱ्या मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले.