एक्स्प्लोर

Jalgaon: ...तर खानदेशला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची गरज; नक्की काय म्हणाले एकनाथ खडसे?

Jalgaon News: खानदेशातील प्रकल्प इतरत्र हलवून खानदेशवर अन्याय केला जात असेल, तर खानदेश महाराष्ट्रातून वेगळं करण्याची आवश्यकता असल्याचं मोठं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

Eknath Khadse: खानदेशातील प्रकल्प सातत्याने इतरत्र हलवले जात असतील, तर राज्य सरकारकडून खानदेशवर (Khandesh) सातत्याने अन्याय होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रापासून (Maharashtra) खानदेशला वेगळं करण्याची आवश्यकता आहे, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. जळगावतील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून एकनाथ खडसेंनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. खानदेशात कोणतेही प्रकल्प होत नाही, त्यामुळे विकास रखडला आहे आणि त्यामुळे इच्छा नसतानाही खानदेश महाराष्ट्रापासून वेगळा करावा, असं म्हणावं लागत आहे असेही खडसे यावेळी म्हणाले.

खानदेशातील प्रकल्प इतरत्र वळवले जात आहेत. खानदेशवर सातत्याने अन्याय होत आहे, उत्तर महाराष्ट्रावर सुद्धा हा मोठा अन्याय असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. खानदेश हा राज्यातला स्वतंत्र भाग आहे, त्याच्या विकासासाठी निधी पाहिजेच आणि त्या प्रमाणात स्वतंत्र तरतूद केली पाहिजे. खानदेशकडे राज्याचाच एक भाग म्हणून बघितलं पाहिजें असंही एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंच्या मतदारसंघातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रापाठोपाठ, आता पशु वैद्यकीय महाविद्यालय देखील शासनाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. मात्र जिल्ह्यातील मंत्री निमूटपणे त्याकडे पाहत आहेत, मी एकटाच बोलतो पण सरकारकडून कुठलीही कारवाई होत नसल्याची खंत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. 

विकासच जर थांबला असेल आणि सातत्याने खानदेशवर अन्याय होत असेल तर मग कुणाकडे बघावं, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे असतीस, मग ते गिरीश महाजन (Girish Mahajan) असतील किंवा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) असतील, त्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी आणि जळगावच्या विकासाचे प्रकल्प पुन्हा खानदेशात आणावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील जेवढ्या मोठ्याने बोलतात, त्याच पद्धतीने त्यांनी प्रकल्प पुन्हा खानदेशात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. खानदेशचा विकास करण्यासाठी वेग दिला पाहिजे, अशी टीका यावेळी खडसेंनी केली.

आपल्या मतदार संघाचा विकास व्हावा, यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात, त्याच पध्दतीने जिल्हा आणि खानदेश तसेच उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.

चार महिन्यातून 22 वेळा अवैध धंद्यांबाबत आय जी यांच्यासह मंत्र्यांकडे माझ्यासारखा माणूस तक्रारी करतो, मात्र कोणताही उपयोग होत नाही, असं मत खडसेंनी व्यक्त केलं आहे. सरकारच याला उघड उघड पाठिंबा देत असून अधिवेशनात प्रश्न मांडूनसुद्धा या निगरगठ्ठ सरकारने आतापर्यंत कारवाई केलेली नाही, असंही खडसे म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Monsoon : मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात तीन दिवस आधीच दाखल, पुढील तीन-चार दिवसात बंगालच्या उपसागरात येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January  2024Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावाAmravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget