एक्स्प्लोर

Monsoon : मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात तीन दिवस आधीच दाखल, पुढील तीन-चार दिवसात बंगालच्या उपसागरात येणार

Monsoon Update : साधारणपणे 22 मे रोजी दक्षिण मान्सून हा अंदमानाच्या समुद्रात दाखल होत असतो, यावर्षी तो तीन दिवस आधीच दाखल झालेला आहे. 

मुंबई: नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल (Monsoon Update) झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. तर 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे. 

साधारण 22 मे रोजी  मान्सून हा अंदमानात दाखल होत असतो, या वर्षी मात्र तीन दिवस आधीच हा मान्सून दाखल झाल्याचं चित्र आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन चार दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे. 

दरवर्षी मान्सूनची वाटचाल कशी असते? 

22 मे - अंदमान 
1 जून - केरळ 
7 जून - महाराष्ट्र 

स्कायमेट या खाजगी एजन्सीनंही अंदमानमध्ये मान्सून उशिरानं दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसतेय. त्यामुळं तो विलंबाने दाखल होईल असा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 9 जून आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात 9 जून तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन

वेगारीस ऑफ द वेदरकडून (Vagaries of the Weather) केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे. 

'या' कारणामुळे मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर

दरम्यान दक्षिण भारतीय महासागर परिसरात एक चक्रीवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जातील. अशात मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता अशात मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर होण्याचा अंदाज आहे.

यंदा मान्सून कसा? स्कायमेट आणि आयएमडीचा वेगवेगळा अंदाज

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : दादांचे आमदार काकांच्या वाटेवर ? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट ?Zero Hour Maharashtra Farmer : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमी पीकविमा, जबाबदार कोण?Zero Hour Full : ठाकरे-फडणवीस भेट चर्चा तर होणारच , वर्तमानातील भेट, भविष्याची नवी नांदी ?Zero Hour Guest Center Atul Londe : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचं वक्तव्य मविआत चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Embed widget