![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Naigaon: पश्चिम रेल्वेचा स्तुत्य उपक्रम, वीज निर्मितीसाठी रेल्वे रुळाशेजारी मिनी पवनचक्की
Mumbai: पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकात पाच "विंड टरबाइन" यंञ बसवण्यात आले आहेत, या यंञणेने वीजनिर्मिती होणार आहे.
![Naigaon: पश्चिम रेल्वेचा स्तुत्य उपक्रम, वीज निर्मितीसाठी रेल्वे रुळाशेजारी मिनी पवनचक्की mumbai news western railway installs mini windmills to generate electricity near railway tracks Naigaon: पश्चिम रेल्वेचा स्तुत्य उपक्रम, वीज निर्मितीसाठी रेल्वे रुळाशेजारी मिनी पवनचक्की](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/884f58590f432192bf9226a0e2f4767c1684500445410290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Western Railway: पश्चिम रेल्वे वीज निर्मितीसाठी (Electricity Generation) एक अनोखा उपक्रम राबवत आहे. पश्चिम रेल्वेने नायगाव (Naigaon) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला पाच 'विंड टरबाइन' यंञ, दुसऱ्या शब्दात पाच 'मिनी पवनचक्क्या' (Mini Windmills) बसवल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हे यंञ नायगाव (Naigaon) आणि खार रोड (Khar Road) रेल्वे स्थानकादरम्यानच्या ट्रॅकच्या बाजूला बसवण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेनपासून तयार होणाऱ्या वाऱ्यावर हे यंञ सुरू राहणार आहे आणि त्याद्वारे वीज निर्मिती होणार आहे.
लोकल ट्रेन ही साधारण 50 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावत असते, त्यामुळे या धावत्या लोकलमुळे वाऱ्याची निर्मिती होते आणि निर्माण होणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे 'विंड टरबाइन'चे ब्लेड फिरले जातात आणि याद्वारे या यंत्रातून वीज तयार केली जाते. या मिनी पवनचक्कीची क्षमता 400 वॅट्स इतकी आहे, या दरम्यान 2 किलोवॉट सौरऊर्जेचं आऊटपुट या यंत्रातून मिळतं, त्यामुळे रेल्वे स्थानकातील वीज उपकरणास त्याचा उपयोग होतो.
पश्चिम रेल्वे या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणासंबधी मोठं काम करत आहे. हे यंत्र यशस्वी झाल्यास सर्व रेल्वे स्थानकांच्या रेल्वे रूळाशेजारी असे 'विंड टरबाइन' लावण्याचा मानस पश्चिम रेल्वेचा आहे. पश्चिम रेल्वेने या अगोदर 97 रेल्वे स्थानकांवर, तर 46 हून अधिक रेल्वे कार्यालयाच्या इमारतींवर सौर ऊर्जेचे उपकरण लावले आहे. आता 'विंड टरबाइन' हे सगळ्या रेल्वे स्थानकांवर व्यापक प्रमाणात लावून, याचा उपयोग वीज निर्मितीसाठी करण्यात येणार आहे.
आजच्या घडीला सर्वात जास्त विजेचा वापर हा रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर केला जात आहे. या यंत्रामुळे रेल्वे स्थानकात आवश्यक असलेल्या विजेचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या यंत्रणेचे स्वागत केले असून, वीज निर्मितीसाठी सर्व रेल्वे स्थानकांत अशी यंत्रणा बसवावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या यंत्रणेने वीजनिर्मिती होणार आहे, रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या वीज उपकरणांवर विजेचा भार कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेने नायगाव आणि खार रोड रेल्वे स्थानकादरम्यान निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ब्लेडचे पाच खांब उभे केले आहेत. जेव्हा एखादी ट्रेन जवळून जाते, तेव्हा हे ब्लेड फिरू लागतात जे पवन ऊर्जा निर्माण करुन वीज निर्मिती करतात. काही रेल्वे अधिकाऱ्यांनी परदेश दौऱ्यात रेल्वे स्थानकांदरम्यान पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या अशा पवनचक्क्या पाहिल्या होत्या, त्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्रीन एनर्जी उपक्रमाचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या दोन रेल्वे स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर त्यांची स्थापना केली.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)