शेतात काम करताना कोसळली वीज, जळगावमध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू, एकजण जखमी
राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात मुसळदार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.

Jalgaon : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात मुसळदार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. अशातच जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. कोंगानगर येथे आज दुपारी शेतात काम करत असताना अचानक वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे.
मृत व्यक्तींची नावे
1. लखन दिलीप पवार (वय 14 वर्षे, रा. कोंगानगर)
2. दशरथ उदल पवार (वय 24 वर्षे, रा. कोंगानगर)
3. समाधान प्रकाश राठोड (वय 9 वर्षे, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)
या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय 35 वर्षे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.






















