'बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला'; एकनाथ खडसेंची शहाजीबापूंवर बोचरी टीका
Maharashtra Politics : बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, असं म्हणत एकनाथ खडसेंनी शहाजीबापूंना टोला लगावला आहे.
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. बायकोला साडी घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत असं वक्तव्य शहाजीबापूंनी केलं होतं, त्या वक्तव्याचा खडसेंनी समाचार घेतला आहे.
बायकोलाही साडी घ्यायला पैसे आपल्याजवळ नव्हते, आपली पूर्वीची परिस्थिती सांगताना शहाजीबापू पाटील यांनी असं वक्तव्य केलं होतं. शहाजीबापूंच्या या वक्तव्याचा एकनाथ खडसे यांनी समाचार घेतला आहे. आपल्या बायकोलाही जो माणूस साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, अशा शब्दांत शहाजीबापूंना टोला लगावला आहे.
पाहा व्हिडीओ : आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला : एकनाथ खडसे
एकनाथ खडसे बोलताना म्हणाले की, "शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगताना म्हटलं की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. हे वक्तव्य शहाजीबापूंनी कदाचित गमतीनं किंवा उद्वेगानं केलं असेल. आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? मात्र शहाजी बापूंनी जे म्हटलं आहे, हे कोणत्या हेतूने म्हटलं हे मला माहिती नाही. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आता कोणाकडे आशेनं बघण्याची आवश्यकता नाही."
काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील?
शिंदे गटात असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आपल्या काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... ओक्केमधी सगळं या वक्तव्यानंतर चर्चेत आले. तेव्हापासूनच शहाजीबापूंची महाराष्ट्रभरात क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रभरात दौरा करणारे शहाजीबापू अनेकदा भाषणांमध्ये आपल्या आधीच्या परिस्थितीबाबत सांगतात. यापूर्वी अनेकदा आमदार शहाजी बापू पाटलांनी अनेकदा भाषणांमध्ये बोलताना त्यांची पूर्वीची स्थिती सांगितली होती. आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटलांनी केलं होतं. याच वक्तव्याचा समाचार घेत एकनाथ खडसेंनी शहाजी बापूंवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aaditya Thackeray : राज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहीत, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला