एक्स्प्लोर
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना सात तर गुलाबराव देवकरांना पाच वर्षांची शिक्षा
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवलं आहे. निकाल देताना न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह सर्वच 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
धुळे : राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षापासून घरकुल घोटाळ्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. या प्रकरणातील 30 नगरसेवकांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
निकाल देताना न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह सर्वच 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांना, तुम्हाला काही मांडायचे आहे का? असे विचारले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा या घरकुल घोटाळ्याची कोणताही संबंध नाही, ते आता वयोवृद्ध आहेत असेच म्हणत जोरदार युक्तीवाद केला.
प्रमुख आरोपींना अशी झाली शिक्षा
- सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा, 100 कोटींचा दंड
- गुलाबराव देवकरांना पाच वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंड
- तत्कालीन मुख्य दंडाधिकारी पी. डी. काळेंना पाच वर्षांची शिक्षा, पाच लाख दंड
- प्रदीप रायसोनी यांना पाच वर्षाशी शिक्षा, तर पाच लाखांचा दंड
- जगन्नाथ वाणी यांना सात वर्षांची शिक्षा, 40 कोटींचा दंड
- राजेंद्र मयूर यांना सात वर्षांची शिक्षा, 40 कोटींचा दंड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बीड
बीड
क्राईम
Advertisement