एक्स्प्लोर

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी

निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी अंनिसनं हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता.

संगमनेर : निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावर आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या वेळी अंनिसनं हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याला इंदोरीकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला असून आज न्यायालय हस्तक्षेप याचिका अर्ज स्वीकारणार की फेटाळणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

सम तारखेला स्त्रीसंग झाला तर पुत्रप्राप्ती होते, असं जाहीर वक्तव्य किर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केलं होतं. त्यानंतर PCNDT कायद्याअंतर्गत संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. दिवाणी न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज तिसरी सुनावणी होणार आहे. जानेवारी महिन्यात नवी मुंबईतल्या उरणमध्ये इंदोरीकरांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती.. PCPNDT कायद्याखाली व्यक्ती दोषी आढळला तर तीन ते पाच वर्षाची शिक्षा आणि 10 ते 50 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुणे जिल्ह्यातील उरण व नगर तालुक्यातील एका ठिकाणी आपल्या कीर्तनातून सम आणि विषम तिथीचे सूत्र मांडतांना त्यातून अपेक्षित संततीची प्राप्ती होते असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात इंदोरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले होते? 'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'

जगा अन् जगू द्या..! इंदोरीकर विरोधकांना सिंधुताई सपकाळ यांची भावनिक साद

इंदोरीकरांनी मागितली होती माफी अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वाद टोकाला गेल्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं होतं. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असं त्यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले कडकडीत बंद, बाईक रॅली काढत युवकांचा इंदोरीकरांना पाठिंबा

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरु, संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचा इशारा 

वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी

माझा विशेष | इंदोरीकर महाराजांना टार्गेट केलं जातंय का? 

मोर्चा, आंदोलनं करु नका; व्हायरल पोस्टवर इंदोरीकर महाराजांचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

Rajendra Jain Rajya Sabha NCP Politics: कुठलीही चर्चा नसताना राज्यसभेची उमेदवारी मिळाली; राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कुठलीही चर्चा नसताना राज्यसभेची उमेदवारी मिळाली; राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live News Updates: जेजुरी गडावर पुजाऱ्याला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा नोंद
Maharashtra Live News Updates: जेजुरी गडावर पुजाऱ्याला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा नोंद
Gondia News : गोंदियात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; बच्चू कडूंसमोर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी वाचला तक्रारींचा पाढा; भर मंचावर भाजपला निर्वाणीचा इशारा
गोंदियात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; बच्चू कडूंसमोर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी वाचला तक्रारींचा पाढा; भर मंचावर भाजपला निर्वाणीचा इशारा
Narendra Bhondekar: एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होणार!, आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या विधानानं महायुतीत पुन्हा मुख्यमंत्रीपदावरून राजकीय 'वॉर'! म्हणाले, 62 पैकी 30 जागांवर...
एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होणार!, आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या विधानानं महायुतीत पुन्हा मुख्यमंत्रीपदावरून राजकीय 'वॉर'! म्हणाले, 62 पैकी 30 जागांवर...

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
Embed widget