एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोर्चा, आंदोलनं करु नका; व्हायरल पोस्टवर इंदोरीकर महाराजांचं आवाहन
काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ चलो नगर ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्याबाबत इंदोरीकर महाराजांनी पत्रक जारी करुन समर्थकांना शांततेचं आवाहन केलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोर्चे, आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.
शिर्डी : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ "चलो नगर" अशी पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु भक्त मंडळींनी रॅली, मोर्चा, आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक जारी करुन शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसंच आपली बाजू कायदेशीररित्या मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे.
या प्रकारानंतर इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी काही दिवसांपासून सोशल मीडियावर "चलो नगर" नावाची पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र इंदोरीकर महाराजांनी समर्थकांना उद्देशून पत्रक जारी करुन म्हटलं आहे की, "वारकरी सांप्रदाय हा शांतता प्रिय आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही रॅली, मोर्चा, आंदोलन करु नये."
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणतात...
पत्रकात काय आवाहन केलं?
"चलो नगर", म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. तरी आपणात नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, आंदोलन करणे, निवदेन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी आपण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती
... तर कीर्तन सोडून शेती करेन, निवृत्ती महाराज इंदोरीकरांची उद्विग्न प्रतिक्रिया
निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले?
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'
इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकंच नाही तर या नोटीसनंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.
इंदोरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
कलम-22 , गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा
अमुकतमुक केल्याने मुलगा किंवा मुलगी होईल, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची जाहीरात किंवा प्रचार हा गुन्हा ठरतो. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंतचा दंड या शिक्षा होऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement