एक्स्प्लोर
Advertisement
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी
इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होत. अखेर आठ दिवसांनी इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिर्डी : अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या
वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे.
मागील आठ दिवसांपासून या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. मात्र प्रकरण आणखी जास्त चिघळण्याआधी इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त करत, यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
या पत्रकात इंदोरीकरांनी काय लिहिलं?
महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिला वर्ग.
आज गत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा.
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणतात...
निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले?
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'
इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकंच नाही तर या नोटीसनंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.
इंदोरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
कलम-22 , गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा
अमुकतमुक केल्याने मुलगा किंवा मुलगी होईल, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची जाहीरात किंवा प्रचार हा गुन्हा ठरतो. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंतचा दंड या शिक्षा होऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement