एक्स्प्लोर
कर्जबाजारीपणाला कंटाळून इंदापूर बँकेच्या संचालकांची आत्महत्या
वंसत पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून ते इंदापूर अर्बन बँकेचे संचालकही आहेत. घराजवळील विहिरीत उडी मारुन वसंत पवार यांनी आत्महत्या केली.
पुणे : शेतीसाठी कालव्यातून पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याने जीवन संपवलं आहे. वंसत पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून ते इंदापूर अर्बन बँकेचे संचालकही आहेत. घराजवळील विहिरीत उडी मारुन वसंत पवार यांनी आत्महत्या केली.
शेतीला पाणी मिळत नसल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.
आपल्या आत्महत्येला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि पालकमंत्री गिरीष बापट जबाबदार आहेत, अशी चिठ्ठी वसंत पवार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपल्या मित्रांनी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असाही उल्लेख वसंत पवार यांनी चिठ्ठीत केला आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement