Mumbai Airport HQ :" मुंबई विमानतळाचे मुख्यालय कुठेही जाणार नाही", अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण
मुंबई विमानतळाचं मुख्यालय गुजरातला स्थलांतरित करण्यावर अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण आले आहे.
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी समूहाला नुकताच मिळाला. हा ताबा मिळताच आठवड्याभरातच अदानी कंपनीचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलविण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले. मात्र अदानी समूहाने ट्वीट करत या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. "या अफवा असून मुख्यालय हे मुंबईमध्ये राहणार आहे," असे म्हणत चर्चांचे खंडण केले आहे.
मुंबई विमानतळाचं मुख्यालय गुजरातला स्थलांतरित करण्यावर अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण आले आहे. अदानी ग्रुपने ट्वीट करत म्हटले आहे की, "मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादकडे जाणार या अफवा आहेत. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाचं मुख्यालय या दोन्ही विमानतळाचे मुख्यालय मुंबईत राहणार आहे. विमानतळाद्वारे मुंबईला हजारो रोजगार उपलब्ध करुन देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."
In light of rumours that the Mumbai Airport HQ will be moving to Ahmedabad, we unambiguously state that both MIAL and NMIAL Airports will remain headquartered in Mumbai. We reiterate our commitment to make Mumbai proud and create thousands of jobs through our airport ecosystem.
— Adani Group (@AdaniOnline) July 20, 2021
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून हे अदानी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलविणे म्हणजे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे वळविण्यात आल्याचा चर्चा सुरू झाल्या. यामुळे मुंबईचा महत्व कमी करण्याचा घाट घातला जातोय का ? मराठी माणसाला खिजवण्याचा प्रयत्न केला जातोय का? असे प्रश्न आता राजकीय पक्षाकडून विचारले जात होते.
मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ ज्याचा ताबा 13 जुलै रोजी जेव्हीके कंपनीकडून अदानी समूहाच्या अदानी एअरपोर्ट होर्डिंग लिमिटेड (AAHL)घेतला. मुंबई विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलने मुंबईत मुख्यालय थाटले आहे. मुंबईसोबत नव्याने तयार होत असलेल्या नवी मुंबई विमानतळाचा ताबा सुद्धा अदानी समूहाकडे आहे. शिवाय, अदानी ग्रुपकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम अशा 6 विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा सुद्धा आहे. मात्र, अचानक आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून विमानतळाचा ताबा मिळताच मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा निर्णयाने अनेकांच्या भुवय्या उंचविल्या होत्या, मात्र अदानी समूहाच्या स्पष्टीकरणानंतर याला पूर्णविराम मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai Airport Update: मुंबई विमानतळाची कमांड आता अदानी समूहाकडे; गौतम अदानी म्हणाले..
- Pegasus Spyware : पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन राजकीय रणकंदन सुरु; विरोधकांची सकाळी तर पंतप्रधानांची संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक
- Rain Update : मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट, रात्रभर सुरु असलेल्या संततधारेनंतर सध्या पावसाची उसंत