एक्स्प्लोर

संचारबंदीत पायी प्रवास करणाऱ्यांवरही गुन्हा; मग कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का?

नियम आणि कायदा सर्वांना सारखे असताना कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का? असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारू लागले आहेत. कारण, संचारबंदीत गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाने दिलेल्या पत्रावर वाधवान कुटुंबीयांनी राजरोसपणे प्रवास केल्याचे समोर आलं आहे.

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झालं अन् क्षणात अनेकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकजण शकडो किलोमीटर पायीच घरी निघाले. तर, काहींनी जीवघेणा प्रवास सुरू केला. यात दोघातिघांना आपला जीवही गमवावा लागला. अनेक ठिकाणी अवैध प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई देखील केली. असे असताना दुसरीकडे सरकारच्या आशिर्वादाने श्रीमंत धेंडांना संचारबंदीत फिरण्याची मुभा मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. लॉकडाऊनमध्येही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालाय. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात संचारबंदी असताना सात गाड्यांमधून दिवाण हाऊसिंगशी संबंधित वाधवान कुटुंबातील 23 जण मुंबईतून महाबळेश्वरला पोहोचले, त्यांना गृहमंत्रालयातील सचिवांनी मदत केली, सोबत पत्र दिलं, त्या पत्राविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही माहितीच नसल्याचंही समोर येतंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचं ट्विट केलंय. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही.

लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ

वाधवान कुंटुंबीय माझा मित्रपरिवार गृह मंत्रालयाच्या विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी कुणाच्या सांगण्यावरुन हे पत्र दिलं, हे तपासानंतर समोर येईलचं. मात्र, वाधवान हे माझे कौटुंबिक मित्र असून कुटुंबातील काही कारणामुळे ते खंडाळ्यावरुन महाबेळश्वर प्रवास करणार आहे, अशी पत्राची सुरुवात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पत्रामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज झाल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीही कल्पना नाही. वाधवान कुटुंबातील काही सदस्य नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. असे असताना त्यांना परवानगी देण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, यावरुन आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाधवान कुटुंबाला संचारबंदीत प्रवासाची परवानगी कशी? किरीट सोमय्यांचं चौकशीचीसाठी राज्यपालांना पत्र

वाधवान कुटुंबीयांना वेगळा न्याय का? देशात लॉकडाऊन झाल्यानंतर लाखो लोकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी शकडो किलोमीटर आपल्या कुटुंब कबिल्यासह पायी वाट घरली. सोबत चिल्लीपिल्ली घेत मजल दरमजल करत ही माणसं चालत होती. यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांचा प्रवास राज्यांच्या सीमांवरती संपला. सीमाबंदी असल्याने त्यांना राज्य ओलांडता आले नाही. तर, अनेकानी कंटेनरमधून, दुधाचे टँकरमध्ये, मालवाहू ट्रकला लटकून जीवघेणा प्रवास केला. असा प्रवास करताना ज्यांना पकडले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. संचारबंदीत कामानिमित्त बाहेर पडल्याने अनेकांना पोलिसांचा मार खावा लागला. दुसरीकडे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणारे वाधवान कुटुंबीय संचारबंदीतही खुलेआम हिंडतंय. नियम आणि कायदा सर्वांनाच सारखा असतो मग वाधवान कुटुबीयांना वेगळा न्याय का? हजारो लोक चालत, बाईकवर, कंटेनरमध्ये लपून प्रवास करत असताना वाधवान कुटुंबीयांना राजरोस कशी परवानगी मिळते? कसलीही इमर्जन्सी नसताना महाबळेश्वरच्या सुटीसाठी ते लॉकडाऊन संपेपर्यंत थांबू शकत नाहीत का? अजूनही त्यांच्यावर महाबळेश्वर मध्ये गुन्हा दाखल का झाला नाही? असे प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Anil Deshmukh | वाधवान प्रकरणी गृहमंत्रालय चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget