एक्स्प्लोर
ग्रामपंचायत क्षेत्रातील 2000 सालापर्यंतची अतिक्रमणं नियमित होणार!
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली.
नागपूर : ग्रामपंचायत क्षेत्रातील 2000 सालापर्यंतची अतिक्रमणं नियमित केली जाणार आहेत. तर 2000 नंतर आणि 2011 सालापर्यंतची अनधिकृत बांधकामं निम्मा रेडी रेकनर घेऊन नियमित केली जातील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.
दरम्यान, 2000 नंतरची केवळ 500 चौरस फुटापर्यंतचीच बांधकामं नियमित केली जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गावातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळणार आहे.
गावठाणची हद्द 200 मीटर वाढवण्यासाठी विधानसभेत विधेयक संमत करण्यात आलं आहे. गायरानची जागा सरकारी प्रकल्पांसाठी देण्याचीही विधेयकात तरतूद आहे. गायरानची जमीन सरकारी प्रकल्प आणि सार्वजनिक कामासाठी देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
राजकारण
शिक्षण
Advertisement