एक्स्प्लोर

मोठी बातमी : रोहित पवार, अमोल मिटकरींची पोलिसांसोबत बाचाबाची, विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक

Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले असताना, पुरावे असताना पोलिस का कारवाई करत नाही असं म्हणत नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले.

मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतके पुरावे आहेत सगळे न्यूजमध्ये सगळं आलेलं आहे, कारवाई का केली जात नाही, पोलीस ठाण्यामध्ये हे नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. 

डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर आक्रमक झालेले आहेत, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी या नेत्यांची आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे फक्त कारवाई करू अशी आश्वासन नको आहेत. तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील या नेत्यांनी केली आहे.

पोलिसांच्या केबिनमध्ये फक्त अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर, रोहित पवारांसह त्यांचे वकील उपस्थित

डीजीसीएच्या अहवालामध्ये देखील व्हिएसआर कंपनीची चूक होती ती समोर आली आहे, कंपनीचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. या दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा प्रामुख्याने दाखल करावा आणि यामध्ये दोघांचाही समावेश आहे, अपघात झाला त्यावेळी डीजीसीएकडून हा अपघात असल्याचं म्हटलं होतं, मात्र दुसरीकडे व्हिएसआर कंपनीचा जो निष्काळजीपणा होता, मेंटेनन्स ठेवलेला नव्हता हे समोर आल्यानंतर या दोन्ही संस्थाच्या संबंधित अधिकाकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल कराला या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पोलिस देखील आहे, एकूण वातावरण तापल्यां दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना पोलिस केबिनच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या केबिनमध्ये फक्त अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर, रोहित पवारांसह त्यांचे वकील उपस्थित आहे.त्यांच्याशी प्रवीण मुंडे चर्चा करताना दिसत आहेत, कायदेशीर कारवाई होईल  आणि ती कायद्याच्या चौकटीत केली जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे, मात्र रोहित पवार अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

रोहित पवार यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले, यावेळी त्यांचा पोलिसांनी शाब्दिक वाद झाला. पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढेही पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. योग्य ती कारवाई करू, कायद्याच्या चौकटीतून ती कारवाई होईल असं त्यांनी यावेळी आमदारांना आणि नेत्यांना सांगितलं मात्र, तक्रारअर्ज करून भागणार नाही गुन्हा दाखल करावा यावरून आमदार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

पुरावे असताना कारवाई का नाही? रोहित पवारांचा संतप्त सवाल

रोहित पवार यांनी पोलिस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना धारेवर धरत विचारले की, "राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर (FIR) का दाखल करत नाहीत?" विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

तर आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत," असे मिटकरी म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंढे तातडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली.

 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Death Case High Court Result: दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
Amravati News: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार,12 लाखाचे व्हेंटिलेटरची साडे बावीस लाखात खरेदी; माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुखांचा गंभीर आरोप
अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार,12 लाखाचे व्हेंटिलेटरची साडे बावीस लाखात खरेदी; माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुखांचा गंभीर आरोप
Krishnaraaj Mahadik and MNS: काल मनसेच्या चोरांना आमच्या भाजयुमोने जशास तसं प्रत्युत्तर दिलं, परत असं कराल तर...; कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग
काल मनसेच्या चोरांना आमच्या भाजयुमोने जशास तसं प्रत्युत्तर दिलं, परत असं कराल तर...; कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग
Krishnaraaj Mahadik On Ravindra Chavan: अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, रवींद्र चव्हाणांनी कान टोचले; आता कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, रवींद्र चव्हाणांनी कान टोचले; आता कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Sandeep Deshpande : गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला
गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला "फेकू " कोण? मनसेच्या संदीप देशपांडेंची डिवचणारी पोस्ट
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
Embed widget