एक्स्प्लोर

Prakash Ambedkar on Nitin Gadkari : तर नितीन गडकरी पुढील पंतप्रधान होतील! प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Prakash Ambedkar on Nitin Gadkari : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी माझा कट्ट्यावर बोलताना देशभरामध्ये भाजपकडून 400 चा दावा करण्यात येत असला तरी यामध्ये तथ्य नसल्याचे म्हणाले. 

Prakash Ambedkar on Nitin Gadkari : भाजपकडून देशांमध्ये 400 च्या गप्पा सुरू असल्या, तरी त्यांना काँग्रेसकडून गडचिरोलीमध्ये जाहीर केलेला उमेदवार पळून न्याव्या लागत असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माझा कट्ट्यावर बोलताना केली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी देशभरामध्ये भाजपकडून 400 चा दावा करण्यात येत असला तरी यामध्ये तथ्य नसल्याचे म्हणाले. 

देशामध्ये भाजप 170 ते 175 जागा जिंकेल 

प्रकाश आंबेडकर यांना भाजप राज्यासह देशभरामध्ये किती जागा जिंकेल? असं विचारलं असता प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देशामध्ये भाजप 170 ते 175 जागा जिंकेल, दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना राज्यांमध्ये भाजप किती जागा जिंकेल? याबद्दल विचारलं असता त्यांनी ही भूमिका थोडी गुलदस्तात राहू द्या असं स्मितहास्य करत उत्तर दिले. 

देशाचे पुढील पंतप्रधान कोण असतील? प्रकाश आंबेडकर म्हणाले.. 

भाजपच्या दोनशेच्या खाली राहिल्यास देशाचे पुढील पंतप्रधान कोण असतील? असे त्यांना विचारण्यात आलं असता प्रकाश आंबेडकर यांनी भाजप 200 च्या खाली राहिल्यास सर्वपक्षीय संबंध असल्याने नितीन गडकरी हेच भाजपकडून पंतप्रधान होतील, असं वक्तव्य माझा कट्ट्यावर बोलताना केलं. तसेच त्यांनी भूपेंद्र यादव यांचंही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले. त्यांचेही सर्वपक्षीय संबंध असल्याचे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, ही स्थिती इंडिया आघाडीच्या बाजूने राहिल्यास कोण चेहरा असेल? यावेळी विविध प्रादेशिक नेत्यांची नावे घेतली. तसेच काँग्रेस जो चेहरा समोर आणेल, त्यावर परिस्थिती अवलंबून असल्याचे ते म्हणाले. यामध्ये ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलिन यांचा पर्याय असल्याचे सांगितले. 

प्रकाश आंबेडकर अजूनही सावध भूमिकेत 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर माझा कट्ट्यावर बोलताना अनेक प्रश्नांवर सावधपणे बोलताना दिसून आले. त्यांनी अजूनही महाविकास आघाडीची बोलण्याची तयारी असल्याचे आपल्या भूमिकेतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीमधील जागावाटपांवर भाष्य करताना वाद असल्याचे  त्यांनी सांगितले, पण कोणत्या जागांवर वाद आहे या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. दरम्यान, 26 मार्चपर्यंत आम्ही वाट पाहणार असून त्यानंतर राज्यात किती आणि कोणत्या जागा लढणार आहोत, याबाबत भूमिका जाहीर करू असेही ते म्हणाले. जालन्यातून मनोज जरांगे पाटील लोकसभेच्या रिंगणात असल्यास 70 टक्के मते देऊ, असाही दावा आंबेडकर यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सChhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT ची बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT ची बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
Sanjay Raut : एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी,  जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी, जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
Embed widget