एक्स्प्लोर

'होय मी वंचित आहे'.... राज्यातील शिक्षक दाम्पत्यांचे आंतरजिल्हा बदलीसाठी आंदोलन

विविध जिल्ह्यात कुटुंबापासून विभक्त राहून विनाअट काम करणाऱ्या शिक्षक दाम्पत्यांच्या आंतरजिल्हा बदल्या करुन त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्याचा हक्क मिळवून द्यावा, या मागणीसाठी आज होय मी वंचित आहे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं.

परभणी : शिक्षक म्हटलं की अध्यापन. याच अध्यापनातून अनेक पिढ्या घडल्या आहेत. इतरांच्या पाल्यांना घडवणारे अनेक शिक्षक दाम्पत्य आज मात्र स्वतःच्या मुलांना कसे घडवायचे या विवंचनेत आहेत. त्याचे कारणही तेवढेच गंभीर आहे. विविध जिल्ह्यात कुटुंबापासून विभक्त राहून विनाअट काम करणाऱ्या शिक्षक दाम्पत्यांच्या आंतरजिल्हा बदल्या करुन त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्याचा हक्क मिळवून द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या शिक्षकांसह त्यांच्या पाल्यांनी "होय मी वंचित आहे" हे अनोखे आंदोलन आज केले.

मागच्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील हजारो शिक्षक दाम्पत्य विविध जिल्ह्यात काम करत आहेत. सध्या कोरोनाचा गंभीर विषय असतानाही हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे या शिक्षक दाम्पत्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. वारंवार मागणी करुनही शासन या शिक्षक दाम्पत्यांच्या विनाअट आंतरजिल्हा बदलीबाबत निर्णय घेत नाही. महत्त्वाचे म्हणजे या बदलीसाठी एक अभ्यासगट समितीही गठित केली होती. त्या समितीचा अहवालही शासनाला प्राप्त झाला असताना, यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आज राज्यभरात कार्यरत असलेल्या शिक्षक दाम्पत्याकडून 'होय मी वंचित' या शीर्षकाखाली अनोखे आंदोलन करण्यात येत आहे, ज्यात त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.

होय मी वंचित आहे'.... राज्यातील शिक्षक दाम्पत्यांचे आंतरजिल्हा बदलीसाठी आंदोलन

कोरोनाच्या या गंभीर आपत्तीत प्रत्येक जण हा आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. मात्र या आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरात 1200 हून अधिक शिक्षक दाम्पत्य हे त्यांच्या त्यांच्या मुख्यालयी अडकले आहेत. पत्नी एका जिल्ह्यात, पती एका जिल्ह्यात आणि कुटुंब एका जिल्ह्यात अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. म्हणूनच या शिक्षक दाम्पत्यांनी शासनाला मागणी करुन तात्काळ या बदल्यांना मान्यता देण्याची मागणी केली आहे.

आज प्रत्येक शिक्षक आणि त्यांचे पाल्य कोरोनामुळे घरीच राहून हातात आपल्या मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन करत आहेत. अनेक शिक्षकांच्या मुलांनी आपली परिस्थिती मांडणारे व्हिडीओही तयार केले आहेत, जे शासनाला पाठवण्यात येत आहेत.

जांभळे दाम्पत्यांची व्यथा लातूर जिल्ह्यातील दिलीप जांभळे हे शिक्षक सध्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा जिल्हा परिषद शाळेत आहेत. तर त्यांची पत्नी सविता सावंत (जांभळे)या परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील इसाद या जिल्हा परिषद या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांची मुलं, आई-वडील हे लातूरला राहतात आणि हे दोघे वेगवेगळ्या जिल्ह्यात. अशीच प्रत्येक जिल्ह्यात 40 ते 50 शिक्षक दाम्पत्य कार्यरत आहेत ज्यांची हिच अवस्था आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळीMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Embed widget