एक्स्प्लोर

दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) महत्वाची माहिती दिली आहे.

CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेतून 2 कोटी 30 लाख माझ्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. काही लोक म्हणत होते की, आचार संहितेपूर्वी या योजना बंद पाडू. आमची देण्याची वृत्ती आहे, आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे राहणारं सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

खोडा घालणारे कुणीही येउद्या ही लाडकी बहीण योजना सुरुच राहणार

आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एका क्लिकवर जमा केले आहेत. आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, हफ्ते घेणारे सरकार नाही असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांची तोंड आता काळी झाली आहेत. आशाताई भोसले यांनी देखील विरोधकांना चांगली चपराक दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. खोडा घालणारे कुणीही येउद्या ही लाडकी बहीण योजना सुरुच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 17000 कोटी जमा

अनेक योजना यशस्वी राबवण्याची  सरकारने जबाबदारी घेतली आहे. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते रागयडमध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास 17000 कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देण्याची वृत्ती आहे. ही योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार अॅडव्हान्समध्ये देणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळं विरोधकांची तोंड काळी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

. लाडकी बहीण योजनेत खोडा घालू नका

या योजनेच्या पैशातून अनेक लाडक्या बहिणांनी कुटुंबासाठी औषधे खरेदी केले, काही घरात लागणाऱ्या वस्तू देखील देखील खरेदी केल्या आहे. अनेक बहिणींनी मला देखील चिठ्ठ्या पाठवल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून बहिणांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेत खोडा घालू नका असं माझं दृष्ट सावत्र भावांना सांगणं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis: लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी नाना पटोलेंचा निवडणूक प्रमुख हायकोर्टात, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळीMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी

Embed widget