Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
Supriya Sule: आगामी विधानसभा निवडणूकीसाठी संपुर्ण राज्यभरातून 1680 अर्ज आले असून मराठवाडा, पश्चीम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मिळून 1280 इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्याची माहिती यावेळी सुळेंनी दिली आहे.
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार प्रक्षात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी संपूर्ण राज्यभरातून 1680 अर्ज आले असुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मिळून 1280 इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्या आहेत. मुंबई आणि कोकणातील 400 इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून मुंबईत होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती पवारांनी घेतल्या आहेत, याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.
मात्र, बारामतीतून कोणीही मुलाखत दिलेली नाही. याबाबत सुप्रिया सूळेंना विचारला असता बारामतीतील शिष्टमंडळ आज शरद पवारांना भेटलं असुन त्यांनी उमेदवारीबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) सुचना केल्याच त्यांनी सांगितलंय. तर रोहित पवारांना याबाबत विचारलं असता बारामतीतून आमची खास रणनीती असल्याने उमेदवार नंतर घोषीत होईल असं त्यांनी सांगितलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चर्चा असताना पक्षाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत मात्र ते सहभागी झालेले नाहीत. त्यांच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी फॉर्म भरले आहेत, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्याच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि उच्चशिक्षित लोक मुलाखतीसाठी आलेले आहेत ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना तिकीट देणे शक्य नाही काही नाराज होतील पण आम्ही संघटनेमध्ये पूर्ण ताकतीने त्यांना जबाबदारी देऊ असंही सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) म्हटलं आहे. पंचायत राज इलेक्शन आमच्या सरकार आल्यावर आम्ही तातडीने घेऊ आणि त्या लोकांना जबाबदाऱ्या देऊ. प्रत्येक जणांचे मेरिट बघून त्यांना संघटनेत किंवा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधान्याने जबाबदारी देऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणूकीसाठी संपूर्ण राज्यभरातून 1680 अर्ज आले असुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मिळून 1280 इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्या आहेत. मुंबई आणि कोकणातील 400 इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून मुंबईत होणार आहेत.
रोहित पवारांची बारामतीबाबत प्रतिक्रिया
बारामती खास मतदारसंघ आहे,ए का पक्षाचे अध्यक्ष निवडणूक लढणार आहेत, म्हणून बारामती बाबत साहेब निर्णय घेतील,बारामती मध्ये उमेदवार आहे. आपल्याकडे साहेब सांगतील, आज बैठक झाली नाही काही असं नाही उद्याही होईल बैठक.अनेक जणांना इथं यायला जमले नाही ते मुंबई मध्ये भेटणार आहेत, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी याबाबतची माहिती दिली आहे.