एक्स्प्लोर
बोट कानाला लावून मोबाईलवर बोला, हिंगोलीच्या पठ्ठ्याचा भन्नाट शोध
रवी क्षीरसागरने हाताला घड्याळासारखं बांधायचं यंत्र तयार केलं. मोबाईलला ते ब्लूटूथच्या माध्यमातून जोडायचं. फोन आला की कानाला हाताचं कोणतंही बोट लावायचं आणि संभाषण सुरु करायचं.

हिंगोली : मोबाईल न वापरणारी व्यक्ती आजकाल सापडणं तसं कठीणच. फक्त फोनवर बोलण्यासाठीच नाही, तर फोटो काढण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठीही मोबाईल वापरला जातो. रहदारीच्या ठिकाणीही सोयीचं व्हावं, यासाठी ऑडिओ ब्लुटूथ उपकरणं निघाली असताना हिंगोलीत राहणाऱ्या एका आठवी पास तरुणाने 'स्पीकर व्हेव'च्या माध्यमातून अफलातून शोध लावला आहे. बोट कानाला लावून आपण समोरील व्यक्तीशी मोबाईलवरुन संभाषण करु शकतो. रवी क्षीरसागर हा केवळ आठवी पास असलेला हा ध्येयवेडा तरुण ड्रायव्हर. कामाच्या शोधात जालना जिल्ह्यातून हिंगोलीत आलेल्या रवीने हिंगोलीत आल्यावर एक अनोखं यंत्र तयार केलं. एका हाताला हे यंत्र घड्याळासारखं बांधून मोबाईलला ब्लूटूथच्या माध्यमातून जोडायचं. फोन आला की कानाला हाताचं कोणतंही बोट लावायचं आणि संभाषण सुरु करायचं. VIDEO | आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीतून विधानसभा लढवणार? रवीने यासाठी घड्याळासारखं डिव्हाईस प्राथमिक स्वरुपात बनवलं आहे. ब्लूटूथ किट, ऑडियो बोल्ड, बॅटरी आणि कॉईल या चार वस्तूंचा यासाठी रवीने वापर केला. शरीराच्या नसमधून ऑडिओ लहरी स्पीकर होऊन बोटातून कानापर्यंत पोहचतात, असा दावा रवी क्षीरसागरने केला आहे. मोबाईल चार्जरने हे यंत्र चार्ज करता येतं. एकदा चार्ज केल्यानंतर दोन तास हे यंत्र काम करतं. हे डिव्हाईस प्राथमिक स्वरुपात आहे. मात्र कानाला बोट लावून बोलणं खरचं शक्य आहे का? तज्ज्ञ मंडळींनी हे संशोधन बघितलंय का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र भविष्यात कानाला फक्त बोट लावून बोलणं अशक्य नाही, हे या संशोधनातून समोर आलं आहे.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















