Bhandara News : ग्रामपंचायतच्या 15 लाखापर्यंतच्या विकासकामांवर उच्च न्यायालयानं लावली कात्री; सरपंच संघटनेचा आक्रमक पवित्रा
Gram Panchayat News : उच्च न्यायालयानं ग्रामपंचायतीचे 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर कात्री लावली आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात आता अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.
Bhandara News भंडारा : ग्रामपंचायतला (Gram Panchayat) 15 लाखांपर्यंतची विकास कामं करण्याची मुभा होती. मात्र, उच्च न्यायालयानं (High Court) 10 जुलैला निर्णय देताना ग्रामपंचायतीचे 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर कात्री लावली आहे. त्यामुळं यानंतर ग्रामपंचायतीला आता केवळ तीन लाखापर्यंतची कामं करावी लागणार आहे. यामुळं राज्य सरकारनं या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात स्टे आणावा आणि राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्ववत 15 लाखांपर्यंत कामं करण्याची मुभा देण्यात यावी, यासाठी आता अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.
तोडगा नं निघाल्यास 28 ऑगस्टपासून मुंबईत बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
15 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारनं हा निर्णय घ्यावा. यासह सरपंच संघटनेच्या विविध मागण्यांना घेवून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. मागण्या मान्य नं झाल्यास 16 ऑगस्टपासून राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कुलूप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात कुठलाही तोडगा नं निघाल्यास 28 ऑगस्टपासून मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार भंडाऱ्यात सरपंच संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत भंडारा पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
...तर 15 ऑगस्टला झेंडावंदन करू देणार नाही
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसच्या वतीने 3 ऑगस्टला आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान दिलीप बनसोड यांनी 15 ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण झाले नाही तर 15 ऑगस्टला झेंडा फडकू देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली होती. दरम्यान, आता दिलीप बनसोड यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून लोकांचा त्रास दूर व्हायला पाहिजे, राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूचे खड्डे बुजविल्या पाहिजे यासाठी मी 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर लोक किती तीव्र झाले आहेत, हे लक्षात घेता सरकारने हे काम तात्काळ करायला पाहिजे असेही ते म्हणाले. तर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यापेक्षा तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी भाजपाचे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिलीप बनसोड यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या