एक्स्प्लोर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळापासून 40 हजार रोहिंग्यांचे आजही दिल्लीत वास्तव्य; माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Hansraj Ahir : 40 हजार रोहिंग्या अजूनही दिल्लीत वास्तव्यास आहेत. ते परत माघारी गेले नसल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केलाय.

Bhandara News भंडारामाजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सत्ताकाळात 2012 मध्ये 40 हजार रोहिंग्या दिल्लीत आलेत. मनमोहन सिंगांनी त्या सर्वांना दिल्लीत बसविले. त्यांनी लोकसभेत ठराव घेतला हे रोहिंग्या सहा वर्ष दिल्लीत राहतील. मात्र, आता 2012 ते 2014 या 12 वर्षांचा कालावधी झाला असतानाही हे रोहिंग्या अजूनही दिल्लीत वास्तव्यास आहेत. ते परत माघारी गेले नसल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांनी केला आहे. भंडारा इथं भाजप जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते भाजप पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. 

... अन्यथा 90 टक्के रोहिंग्या त्रिपुरामार्गे भारतात घुसले असते

2017-21 मध्ये म्यानमारमध्ये पुन्हा उठाव झाला, त्यावेळी पूर्ण रोहिंग्या बाहेर आलेत. ही संख्या जवळ जवळ 7 लाखांच्या घरात होती. मात्र, त्यावेळी हे लोक भारतात आले नाहीत. तर ते बांग्लादेशात गेलेत. त्यावेळी सरकार आपलं नसतं तर, त्यातील 90 टक्के रोहिंग्या त्रिपुरामार्गे भारतात घुसले असते. मोदींनी सीमांकन केलं आहे. त्यामुळे हे रोहिंग्या थांबलेत, ही ताकद मोदी सरकारची आहे. सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी सुद्धा आता देश पूर्णपणे सुरक्षित होत चालला असल्याचे गौरोद्गार काढले आहे. देशाला भाजप सुरक्षित करीत आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ता हा देशभक्त असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय गृह राज्य तथा राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केलं. 

विदर्भात पुन्हा 40 प्लस चा आकडा, भंडाऱ्यावर मोठी जबाबदारी

विदर्भामध्ये पुन्हा 40 प्लस चा आकडा आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर भंडारा जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे. राजकीय प्रस्ताव हा दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडायचा होता. मात्र, भंडारा येथील बैठकीला केवळ 245 पदाधिकारी उपस्थित असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणातून नाराजी व्यक्त करीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. 

भंडाऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून नाराजी व्यक्त करतानाच बावनकुळे यांनी वर्धा आणि पुसद या जिल्ह्यात झालेल्या अधिवेशनाबाबत तारीफ केली. वर्ध्येत बुथ अध्यक्ष, सचिव महिला अध्यक्ष, सोशल मीडिया अध्यक्ष, मागासवर्गीय अध्यक्ष असे साडे तेराशे पदाधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचं महाअधिवेशन घ्यायचं आहे. दोन विधानसभेचा सर्वात लहान जिल्हा असलेल्या पुसद येथेही महाअधिवेशन मोठ्या थाटात झालं. मात्र भंडाऱ्यात बैठकीला 245 पदाधिकारी आणि कोर ग्रुप मंचावर बसला असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांच्या कमी उपस्थिती वरून महाअधिवेशन होऊ शकत नाही. अधिवेशनाला उंची द्यावी लागेल. एक वेगळा संदेश महाअधिवेशनाच्या माध्यमातून भंडाऱ्यातून द्यायचा आहे, आणि तो संदेश विदर्भात किती समोर जावू शकतो, हा संदेश असणार असल्याच्या कानपिचक्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Union Budget 2025 : कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman on Income Tax Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवलीUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : कस्टम्स ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली,  कॅन्सरच्या औषधांचा समावेशUnion Budget 2025 : Nirmala Sitharaman on Income Tax Slabs 2025 : 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्तUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : जहाज निर्मिती, उडान योजना ते पर्यटन; मोठ्या घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Union Budget 2025 : कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Agriculture Budget 2025 : अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Embed widget