एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मल्टिप्लेक्समध्ये सरसकट खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का? : हायकोर्ट
मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्या सव्वा किमतीत का विकले जातात? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच जर लोकांना त्यांच्या घरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते? असा हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल विचारला आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्या सव्वा किमतीत का विकले जातात? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच जर लोकांना त्यांच्या घरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते? असा हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल विचारला आहे.
जर सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी असेल तर मग सरसकट सगळ्याच अन्नपदार्थांना मल्टीप्लेक्समध्ये बंदी का नाही? असा सवालही हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल विचारला आहे. 12 जूनपर्यंत याबद्दल धोरण ठरवा आणि तसं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश कोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.
जैनेंद्र बक्षी यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मल्टीप्लेक्समध्ये तिथले महागडे अन्नपदार्थच विकत घ्यावे लागतात, कारण तिथं घरगुती अन्नपदार्थांना आत नेण्यास मनाई असते, असं याचिकेत म्हणण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीला प्रकृतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालत नसेल, तर त्यालाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती का? असा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्समध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्याची परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
दरम्यान पनवेल इथल्या एका मल्टीप्लेक्समध्ये यावरुन वाद झाला होता, असं मल्टीप्लेक्स संघटनेच्या वतीनं कोर्टाला सांगण्यात आलं. पण त्या मल्टीप्लेक्स मालकाला यावर न्यायालयात दाद मागता येईल, एका प्रसंगावरुन सरसकट मल्टीप्लेक्स मालकांची बाजू योग्य असं म्हणता येणार असंही यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement