(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hidden Forts In Pune : हुश्श! इथे गर्दीच नाही; यंदाच्या पावसाळ्यात 'हे' किल्ले नाही पाहिले... तर काय पाहिलं!
पावसाची मज्जा घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात, मात्र गर्दी नसलेल्या किल्यांवर जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. पुण्यातील गर्दी नसलेले किल्ले तुम्हाला माहित आहेत का?
Hidden Forts For Trekking In Pune : पुणे आणि पुणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. यामुळे या परिसरात बरेच गडकिल्ले आहेत, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडकिल्ल्यांच्या उंचच-उंच गडकिल्यांच्या कोकणकड्यावरून वर्षाविहारचा आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यात अनेक पर्यटक या गडकिल्यांना भेट देत असतात. तुम्ही पण गर्दी नसलेल्या गडकिल्यांना भेट देण्याचा आणि पावसाचा आनंद लुटण्याचा विचार करत असाल तर या गडांना नक्की भेट द्या.
1. किल्ले जीवधन (Jivdhan Fort) -
हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला असुन प्रचंड उंचावर आहे. या ठिकाणाहून दिसणारे मनमोहक कोकणकडा आणि समोरील वनरलिंग सुळक्याचे दृश्य मनाला आनंद देऊन जाते. घनदाट झाडीतून प्रवास करताना धुक्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येतो.या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जुन्नर शहरात यावे लागते तेथून हा किल्ला 29 किमी अंतरावर आहे,तर पुण्यातून 123 किमी आणि मुंबईपासून 122 किमी आंतरावर आहे.
2. वनरलिंगी सुळका (Wanarlingi Sulka)
हा सुळका किल्ले जीवधनच्या अगदी समोर असून त्याची उंची जमिनीपासून 385 फुट आहे. हा सुळका पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी पर्वणीच समजला जातो. सोशलमीडियावर प्रचंड चर्चेत असणारा हा वनरलिंगी सुळका पुणे मुंबईपासून प्रत्येकी 130 किमी आहे.
3. किल्ले चावंड (Chavand Fort)
पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर तालुक्यात हा चावंड किल्ला आहे. हा किल्ला चढाईसाठी आवघड असून गडावर जाण्यासाठी दगडी पायरीमार्ग आहे. गडावर जात असताना उंचावरुन माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसते. हा किल्ला पुण्यातून 110 किमी तर मुंबईपासून 130 किमी आहे.
4. किल्ले हडसर (Hadsar Fort)
हा किल्ला आपल्या प्रचंड आकारासाठी प्रसिद्ध आहे. गडावर जाताच आपल्याला शिवमंदिराचा दर्शन होते आणि समोर असणाऱ्या तलावाचे दृश फारच सुंदर आहे. पावसात या ठिकाणी आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटता येतो. हडसर हा किल्ला पुणे मुंबईपासून साधारण चार तासांच्या अंतरावर आहे.
5. हनुमंतगड-निमगिरी (Hanumant Gath And Nimgiri)
हे दोन्हीही किल्ले शेजारी-शेजारी आहेत. कल्याण-अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या मढ गावाजवळ आहे.पावसाळ्यात या गडापर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यावर आपल्याला आजूबाजूला धुकं, भरपूर पाऊस आणि आजुबाजूची भातशेती या सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो.
6. हटकेश्वर डोंगर (Hatkeshwar Fort)
हा हटकेश्वर ट्रेक करण्यासाठी आपल्याला संपूर्ण एक दिवस लागतो. गड चढून जाताना आपल्याला लेण्याद्री गणपती डोंगर,शिवनेरी किल्ला,पिंपळगाव जोगा धरण,येडगाव धरण आणि हरिचंद्रगडासोबतच सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आपल्या मनाला गवसणी घालतात. सोबतच गडावर दोन सुळक्यांना जोडण्यासाठी दुर्मिळ असा नैसर्गिक पुल आहे. या ठिकाणी आपल्याला आपण क्षितिजसमांतर असल्याचा भास होतो.या ठिकाणी जाण्यासाठी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गोद्रे गावात जावे लागते. हे ठिकाण पुण्यापासून तीन तास तर मुंबईपासून चार तास अंतरावर आहे.
ही बातमी नक्की वाचा-