एक्स्प्लोर

मराठवाड्यातल्या महाप्रलयानं 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली

बीड/ उस्मानाबाद : मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या तुफान पावसानं दुष्काळ धुऊन निघाला, तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. या महाप्रलयाने तब्बल 16 लाख हेक्टर शेतं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातल्या 16 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीवर अद्यापही पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिक वाया गेलं आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पाऊस ओसराला मात्र... दरम्यान, आज मराठवाड्यातून पाऊस ओसरला, तरी अनेक ठिकाणी अद्यापही पूरस्थिती कायम आहे. तुफान पावसामुळे भोगावती नदीला पूर आला आहे. शहरासह जिल्ह्यातले सारे तलाव, नदी, नाले, ओसंडू वाहत आहेत. 1265 लोक स्थलांतरीत, अनेक जनावरांना जलसमाधी तिकडे बिंदुसरा नदीच्या पाण्यानं अख्खं बीड जलमय झालं आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात 10 छोटे-मोठे तलाव फुटले. तसेच 22 जनावरे वाहून गेली आहेत. तर लातूर जिल्ह्यातल्या 16 गावातल्या 1265 लोकांना स्थलांतरीत करण्यात आलंय. लातूरात दिवसभरात 16 जनावरांना जलसमाधी मिळाली. सीना कोळेगाव, तेरणा मध्यम प्रकल्प, माजलगाव, मांजरा, लांबोटी, मांजरा 11 बॅरेजस या प्रकल्पातून पाणी विसर्ग सुरू असल्याने पुर स्थिती कायम आहे. गोदामाईलाही पूर बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग केला जानार असल्याने पुर्णा काठच्या हिंगोली, परभणीतल्या गावांना सतकर्तेचा इशारा दिला आहे. परभणी- निम्न दुधना प्रकल्प भरला असून 350 क्यूसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. परभणीच्याच गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, मुळी, दिग्रस बंधार्यातून विसर्ग सुरू. गोदाकाठी इशारा देण्यात आलाय. मांजरा धारणाचे सहाही दरवाजे सवा दोन मीटरनी उचलल्याने मांजराकाठी सावधानतेचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्रालाही फटका मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रालाही काहीप्रमाणात परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. परंड्यातलं सिना केळेगाव ओव्हर फ्लो झाल्यानं सोलापूर जिल्ह्यात हाई अलर्ट जारी करण्यात आला आहे. माकणी धरण 85 टक्के भरले आहे. संबंधित बातम्या उजनी धरण काठोकाठ, 7 दरवाजांमधून विसर्ग सुरु LIVE : लातूर-तुळजापूर मार्ग बंद, तुळजापुरातील भाविक अडकले मराठवाड्यात मुसळधार पाऊस, 30 जण पुरात अडकले, बचावकार्य सुरु LIVE: मराठवाड्यात पावसाचा कहर, लातूर-नांदेड वाहतूक बंद राज्यात सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस बरसला! मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी बोअरवेल आपोआप वाहू लागले, धबधबे कोसळू लागले फोटो: सोलापुरातील भोगावती नदीचं रौद्र रुप  फोटो: बीडमधील अतिवृष्टीचे ड्रोनमधून टिपलेले दृश्य  फोेटो: बीडध्ये पूरसदृश्य परिस्थिती, बार्शीनाका पूल पाण्याखाली  फोटो: तेरणा धरण 2010 नंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो  फोटो: तुळजापुरात कोसळधार, शेतीचं मोठं नुकसान फोटो: परतीच्या पावसाचा कहर, लातुरात तुफान पाऊस  VIDEO: सोलापूर : उजनी धरण ओव्हरफ्लो, 7 दरवाजे उघडले VIDEO: मराठवाड्यात तीन दिवसांनी पावसाची उसंत, पूरस्थिती कायम VIDEO: डिटेल रिपोर्ट : पाऊस ओसरल्यानंतर मराठवाड्यात आज काय स्थिती आहे? VIDEO: परतीच्या पावसाने मराठवाडा सुजलाम् सुफलाम्! VIDEO: उस्मानाबादः सेल्फी घेताना पाण्यात पडलेला तरुण थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget