एक्स्प्लोर

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं जोरदार कमबॅक

मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. उन्हाच्या झळांनी हैराण मुंबईकर सुखावले गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाळी झळ भासत असतानाच, काल रात्री झालेल्या मुसळधार पावासानं हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. काल मध्यरात्री मुंबईत तुफान पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते दीड तास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अजूनही मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाची रिपरिप सुरुच आहे. नवी मुंबईतील काही भागात वीजपुरवठा खंडित तर तिकडे नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास विजांच्या कडकडांटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर कामोठे आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करावा लागला. पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिकमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर पाहता शहरातील अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या दोन्ही वेळेस मुसळधार पावसामुळे नाशकात पूरपरिस्थिती ओढवली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदाही पावसाचा जोर पाहता नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे झाड कोसळून वाहतूककोंडी जोरदार पावसानं काल रात्री लातूरला अक्षरश: झोडपून काढलं. पावसाच्या जोरानं शहरातील नाना-नानी पार्क समोरील भेळच्या गाडीवर झाड कोसळलं, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकही बंद आहे. तसंच कोल्हेनगर, श्रीकृष्णनगर, कोयना रोड, बादाडे नगर आदी भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तुफान पावसाने अंबेजोगाई शहर जलमय बीडमध्येही काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं शहरातील सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. अंबाजोगाई शहरात सर्वत्र पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही पाणी साचलं आहे. बीडमधील बिंदुसरा नदी ओव्हरफ्लो वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं बीड  शहरातील दगडी पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. दरम्यान, नदीवरील दगडी पुलावरून आज सकाळी एक गाय पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. साताऱ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग साताऱ्यातही रात्री 11.30 वाजल्यापासून तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार बरसणारा पावसाने पहाटे पाच वाजण्याता उघडीप दिली.

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget