एक्स्प्लोर

तानाजी सावंतासोबत ठाकरे गटाचे खासदार-आमदार, उस्मानाबादमधील कार्यक्रमानंतर चर्चेला उधाण

Osmanabad : उस्मानाबाद येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Osmanabad News Update : शिवसेना पक्षाचं नाव आणि  धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी निवडणूक आयोगानं घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठिकठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील राडा झालाय. असे असताना उस्मानाबाद येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ), ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) आणि आमदार कैलास पाटील ( kailas patil ) एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. एवढंच नाही तर मंत्री तानाजी सावंत यांनी खासदार निंबाळकर आणि आमदार पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा दिल्या. या तिघांच्या एकत्र येण्याने राजकीय वर्तुळात मात्र अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. 

उस्मानाबाद येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना जवळ केले. त्यां दोघांच्या खांद्यावर हात टाकत हात उंचावून घोषणा दिल्या. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मंत्री सावंत, खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात दुरावा व अबोला असल्याचे दिसत होते. परंतु, हे तिघे एकत्र आल्यामुळे तो आज काही अंशी दूर झाल्याचे चित्र होते. मंत्री सावंत आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यात सुरुवातीला चांगले राजकीय संबंध होते. मात्र शिवसेना फुटल्यानंतर अबोला झाला होता. परंतु, आज हे तीन नेते एकत्र आल्याने चर्चा रंगत आहेत. 

गेल्या आठवड्यात भाजप आमदार राणा पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधीच्या असमतोलतेबाबत लेखी तक्रार केल्यानंतर दोघात दरी पडली आहे. त्यातच आमदार राणा यांचे परंपरागत राजकीय विरोधक खासदार ओमराजे व पाटील यांच्यासोबत सावंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळीक वाढवली. सावंत यांनी समय सूचकता दाखवत सूचक संदेश दिला. हे तिघे जण एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत असल्या तरी काही वेळातच ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे. तर खासदरा ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी देखील या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये असे म्हटले आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आम्ही एकत्र आल्याचे दोघांनी सांगितले. 

कोणाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायचं असेल तर त्यांचं स्वागत : ओमराजे निंबाळकर 

"उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंदे गट आणि भाजपचे राजकारण लक्षात आल्यामुळे किंवा त्यांना काही संदेश द्यायचा असेल म्हणून त्यांनी ती कृती केली असेल. शिवजयंतीच्या कार्यक्रमात सर्वच पक्षाचे नेते एकत्र येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून आम्ही तेथे गेलो होतो. जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी मंत्री तानाजी सावंत यांची जी तक्रार केली आहे त्या घटनेचा संदर्भ आजच्या घटनेशी संबंध असू शकतो, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. शिवाय राज्यातील राजकारणात काय सुरू आहे हे लक्षात आल्यामुळे कोणारा उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. 

आम्हाला कोणतीही ऑफर नाही : कैलास पाटील

ही कोणत्याही गटाची शिवजंती नव्हती. आयोजकांनी सर्वांनाच बोवल्यामुळे आम्ही तेथे गेलो होतो. आमच्यात कोणतंच बोलणं झालं नाही. आम्हाला कोणतीही ऑफर नाही. आमची निष्ठा फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. जर त्यांच्यासोबत आणखी कोणाला यायचं असेल तर आम्ही त्यांच्यासोबत काम करू, असे आमदारा कैलास पाटील यांनी म्हटले आहे. 

पाहा व्हिडीओ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget