Tanaji Sawant Controversial Statement: बाळासाहेब, वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही सात लाखांची गर्दी जमवली; तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य
Tanaji Sawant Controversial Statement: ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही, त्या पंढरपूरमध्ये या सावंत बंधूनी 7 लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली अशी दर्पोक्ती एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे.
Maharashtra Political News: आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलं आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत (Tanaji Sawant) एका कार्यक्रमात म्हणाले. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकीकडे शिवसेना (Shiv Sena) तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही त्या पंढरपूरमध्ये या सावंत बंधूनी 7 लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली अशी दर्पोक्ती एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी करत सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप, शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहेत? हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर किती अनुदान मिळतं, हे दाखवून दिलं असतं, सावंतांचा विखेंना टोला
काल (मंगळवारी) रात्री वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. ठरलेल्या वेळेपेक्षा चार तास उशिरा कार्यक्रम सुरु झाला खरा, मात्र आरोग्यमंत्र्यांनी भाषणबाजीत सर्वात आधी देशाच्या आदरणीय नेत्यांसोबतच आपली तुलना केल्यानं उपस्थितीतांमध्ये देखील अस्वस्थता सुरु झाली. यानंतर त्यांनी आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद मागत होतो, असे सांगत जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर किती अनुदान मिळतं, हे दाखवून दिलं असतं, असं सांगत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोलाही लगावला आहे.