एक्स्प्लोर
मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची टीका
वर्धा : मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार होते. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, अशा शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी टीका केली.
वर्ध्यातील मोरांगणा येथे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हापरिषद निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या काळात गावातील रोजगार पूर्णपणे बंद झाले, बेकार सरकार होतं, असं म्हणत असताना त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती अशी बोचरी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली.
“मागील दहा वर्षात देश कोमात गेला आहे. स्किल इंडियामुळे शिक्षकांची संख्या कमी होणार, हे मी लिहून देतो. मात्र यासाठी सरकार जबाबदार नसेल. कारण नवे तंत्रज्ञान येत आहेत, असंही ते सांगायला ते विसरले नाही. यासाठी नवीन स्किलफुल शिक्षण दिल जाणार आहे, असंही केंद्रीय अहिर म्हणाले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement