एक्स्प्लोर

Govind Pansare: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड, पुढील तपासासाठी एटीएसला हायकोर्टाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ

Govind Pansare Murder Case: पानसरे यांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आला? तपासात प्रगती किती झाली?, अशी विचारणा बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाकडून करण्यात आली. यावर फरार आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्याप्रकरणाचा नव्यानं तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मुंबई उच्च न्यायालयानं तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणातील आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार दोन आरोपी अद्यापही फरारी असल्याचं एटीएसनं हायकोर्टाला सांगितलं.

पानसरे यांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आला? तपासात प्रगती किती झाली?, अशी विचारणा बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाकडून करण्यात आली. यावर फरार आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे. हे आरोपी अन्य खटल्यांशीही जोडलेले असल्याचं सांगून पुढील तपासासाठी मुदतवाढ देण्याची विनंती एटीसकडून हायकोर्टाकडे करण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायमीर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठानं एटीएसला तीन महिन्यांची मुदतवाढ देत ही सुनावणी तहकूब केली.

एटीएसचा युक्तिवाद

बुधवारी एटीएसकडून या तपासाचा प्रगती अहवाल सीलबंद लिफाफ्यातून हायकोर्टात सादर करण्यात आला. याप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात खटला सुरु झाला असून 6 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. तर अद्यापही फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती एटीएसच्यावतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी हायकोर्टाला दिली. याप्रकरणी आजवर पाच आरोपपत्र दाखल झाली असून उर्वरित तपासही सुरू असल्याचं त्यांनी हायकोर्टाला सांगितलं. यातील फरार आरोपी वगळता तपासातील प्रगतीबाबत हायकोर्टानं एटीएसकडे विचारणा केली असता, अनेक प्रश्नांची उत्तरं आता जरी आमच्याकडे नसली तरीही भविष्यात ती नक्कीच मिळू शकतात. गोविंद पानसरेंच्या हत्येशी अन्य काही खटलेही जोडलेले आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी दोन ते तीन महिन्यांची मुदतवाढ अपेक्षित असल्याचंही मुंदरगी यांनी हायकोर्टाला सांगितलं.

विक्रम भावे आणि शरद कळसकर या दोन आरोपींनी याप्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावल्यानंतर आता आम्ही यावर पुन्हा नव्यानं सुनावणी घेऊ शकत नसल्याचं स्पष्ट करून हायकोर्टानं त्यांची बाजू ऐकण्यास नकार दिला होता. 

काय आहे प्रकरण ? 

20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच दरम्यान अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दक्षिणेतील विचारवंत एम. एम. कलबुर्गी, जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा आरोप असून मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे हा तपास एसआयटीऐवजी एटीएसमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी पानसरे कुटुंबियांनी न्यायालयाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य करून अनेक वर्षांनी हायकोर्टानं प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे सोपवला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Embed widget