एक्स्प्लोर
Advertisement
कॉ. पानसरे हत्या: प्रत्यक्षदर्शीनं तिसऱ्या आरोपीला ओळखलं
पुणे: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारनं कोल्हापूरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलं आहे. त्यामुळे दाभोलकरानंतर पानसरे हत्याकांडाचं गूढही उकललं आहे.
विनय पवार हा सातारा जिल्ह्यातील उंब्रजचा आहे. तो सनातनचा साधकही आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार आहे.
पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यानंतर तिसरा संशयित सनातनचा साधक आणि वीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार याला पोलिसांनी आरोपी केलं आहे
दरम्यान, गुरुवारी पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ.वीरेंद्रसिंह तावडे याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तावडेच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्यात आली. १६ सप्टेंबरपर्यत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम
क्राईम
Advertisement