(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली, काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि मगो पक्षाचे सुदीन ढवळीकर यांच्यात गुप्त बैठक
Goa Election : सोमवारी जाहीर झालेल्या एक्झीट पोलनंतर गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याचं पाहायला मिळतंय.
गोवा : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रमुखांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. 2017 सालाप्रमाणे यावेळी गाफील न राहण्याचं काँग्रेसनं ठरवल्याचं दिसतंय काँग्रेस नेते गोव्यातल्या स्थानिक पक्षांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय.
सोमवारी जाहीर झालेल्या एक्झीट पोलनंतर गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र सरकार स्थापनेसाठी स्थानिक पक्षांशिवाय भाजप किंवा काँग्रेसचीही डाळ शिजणार नाही. अशा स्थितीत सुदिन ढवळीकर यांनी प्रमोद सावंताना थेट विरोध दर्शवलाय. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलण्याची नामुष्की ओढावू शकते. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार मगो पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे नेते आमच्या संपर्कात असून कोणासोबत सरकार स्थापन करायचं याबाबत 10 तारखेला निर्णय घेऊ असं सुदिन ढवळीकर यांनी म्हटलंय
एक्झिट पोलमधून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. त्यांना 13- 17 तर काँग्रेसला 12-16, आम आदमी पार्टीला 1-5, मगोपला 5-9, तर अपक्ष 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे भाजप आणि काँग्रेसला जर सरकार करायच असेल तर मगो पक्षाची साथ घ्यायवीच लोगेल.
एबीपी न्यूज-सी व्होटरनुसार गोव्यात भाजपाला मिळणार इतक्या जागा
2017 मध्ये काय होते निकाल
2017 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनूनही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सत्ता काबीज केली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर एमजीपी 3 आणि इतर पक्षांनी 7 जागा जिंकल्या होत्या.
संबंधित बातम्या :
- Goa Election 2022: गोवा काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता, निकालापूर्वी उमेदवारांना कोल्हापूर-राजस्थानला हलवण्याची तयारी
- Goa Exit Poll 2022 : गोवा बहुमतापासून दूर 'हा' पक्ष ठरणार किंगमेकर
- Elections 2022 Voting : गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान, उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्येही उत्साह