एक्स्प्लोर

बुलढाण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर टोळक्याचा हल्ला, दुचाकीची तोडफोड

बुलढाण्यात दोन जणांना मारहाण करुन एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर टोळक्याने हल्ला केला. दुचाकीची तोडफोड करुन दहशत माजवली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

बुलढाणा : दुचाकी अंगावर टाकल्याच्या कारणावरुन बुलढाण्यात दोन जणांना मारहाण करुन एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्या आणि दगडाने हल्ला केला. तसंच घरासमोर उभी असलेल्या दुचाकीची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना 27 फेब्रुवारीच्या रात्री आठ ते नऊच्या सुमारास कैकाडी पुरा भागात घडली. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेख सरवर शेख अनवर असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून शेख छोटू शेख रहमान आणि मोहम्मद शफी या दोघांना टोळक्याने मारहाण केली. 
     
शेख छोटू शेख रहमान यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, "ते मोहम्मद शफी यांच्यासोबत 27 फेब्रुवारीच्या रात्री आठच्या सुमारास सोळंके लेआऊट इथले रहिवासी पोलीस कर्मचारी शेख सरवर शेख अनवर यांच्या घराचे बांधकाम आणि इतर काम करण्याकरता घरासमोर हजर होते. त्यावेळी त्याठिकाणी आरोपी विक्रम जाधव आणि अनिल पवार यांनी आपली मोटर सायकल अंगावर आणली. तुम्ही मोटरसायकल अंगावर का आणली? असा जाब विचारला असता, दोघांनी शिवीगाळ आणि काठीने मारहाण फिर्यादी शेख छोटू आणि मोहम्मद शफी या दोघांना मारहाण करुन जखमी केले. थोड्या वेळानंतर 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने चाल करुन पोलीस कर्मचारी शेख सरवर यांच्या घरावर हल्ला केला. घरासमोर उभी असलेली दुचाकीची काठ्या आणि दगडाने तोडफोड करुन नुकसान केले." 

या तक्रारीनंतर बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात आरोपी विक्रम जाधव, अनिल पवार यांच्यासह इतर दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसंच पोलिसांनी आरोपी विक्रम जाधव याला अटक केली. 

पोलीस दलात कार्यरत शेख सरवर यांच्या घरावर 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु पोलिसांनी फक्त चार जणांना आरोपी का केले? एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर हल्ला होतो आणि ही घटना पोलीस गांभीर्याने का घेत नाहीत? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha : विधानसभेचं बिगुल वाजताच विजयाचा कौल मिळावा म्हणून नेते मतदारांसोबतच ज्योतिषांच्या घरीBuldhana : शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा असलेल्या शिंगणेंकडून पवारांचीच खिल्ली ?Aaditya Thackeray : शिंदेंसाठी सबका मालिक अदानी; आदित्य ठाकरेंची टीकाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2PM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
DA Hike : केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी, महागाई भत्ता वाढवण्याचा केंद्राचा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
चंद्रकांत पाटील कोथरुडमधून रिंगणात, भाजपचे पहिले 10 मतदारसंघ ठरले, 2 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब: सूत्र
चंद्रकांत पाटील कोथरुडमधून रिंगणात, भाजपचे पहिले 10 मतदारसंघ ठरले, 2 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब: सूत्र
Manoj Jarange Patil on Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, जरांगेंनी समजून घ्यावं, जरांगे म्हणाले, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदाच आहे का?
मुख्यमंत्री म्हणाले, जरांगेंनी समजून घ्यावं, जरांगे म्हणाले, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदाच आहे का?
Eknath Shinde: ‘लाडकी बहीण योजने’ला हात लावला तर करेक्ट कार्यक्रम…एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
‘लाडकी बहीण योजने’ला हात लावला तर करेक्ट कार्यक्रम…एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
Embed widget