एक्स्प्लोर
राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज
पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत राज्यभरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई- पुण्यासह राज्यभर जोरदार तयारी सुरु आहे.
मुंबई: पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत राज्यभरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई- पुण्यासह राज्यभर जोरदार तयारी सुरु आहे.
मुंबईत पोलीस आणि महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज करण्यात आल्या आहेत. मुंबईत तब्बल 40 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसंच अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात येणार आहे.
मुंबईत बाप्पांच्या निरोपाची तयारी
- मुंबईत शंभर ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय
- 69 नैसर्गिक स्थळांवर तर 31 कृत्रीम तलावांचा समावेश आहे
- वाहतूक पोलिसांचे 3 हजार 500 अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. त्याचबरोबर 500 ट्रॅफिक वॉर्डन तयार
- मुंबईत सुमारे 2 लाख घरगुती गणपती तर 11 हजार 500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.
- विसर्जन स्थळावर जीवरक्षक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, ध्वनिक्षेपक, मोटरबोट सज्ज
- विसर्जन स्थळी जीवरक्षक -670
- मोटरबोट 81 प्रथमोपचार केंद्रे 118,
- रुग्णवाहिकांची संख्या 60 तर 201 निर्माल्य कलश ठेवण्यात आलेत.
- एकूण 3404 बसगाड्यांपैकी 1687 बसगाड्यांच्या मार्गात बदल
- मुंबई महापालिकेचे साडेसात हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात
- 7500 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात.
- 500 स्वयंसेवक सज्ज
- महिला आणि वाहतूक पोलीसांची विशेष पथकं तयार
- 1200 सीसीटीव्हींची नजर
- 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद
- विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची नजर
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकूण 53 रस्ते पूर्ण बंद
- 54 रस्ते एकमार्गी आहेत.
- 99 रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.
- मुंबईत गिरगाव चैपाटी, शिवाजीपार्क-दादर चैपाटी, बडामशिद, वांद्रे, जुहू चैपाटी आणि पवई गणेश घाट अशा महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पाच विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे.
- भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंडपासूनची जड वाहनांची वाहतूक 5 सप्टेंबरपासून सकाळी 6 पासून मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.
- शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळ्यापासून जेधे चौकापर्यंत
- लक्ष्मी रस्ता - सोन्या मारुती चौकापासून अलका टॉकीज चौकापर्यंत
- बागडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौकापर्यंत
- बाजीराव रस्ता - बजाज पुतळ्यापासून फुटका बुरुज चौकापर्यंत (दुपारी १२ वाजल्यापासून बंद)
- कुमठेकर रस्ता - टिळक चौकापासून चितळ्यांच्या दुकानापर्यंत (दुपारी १२ वाजल्यापासून बंद)
- गणेश रस्ता - दारुवाला पुलापासून जिजामाता चौकापर्यंत (सकाळी १० वाजल्यापासून बंद)
- केळकर रस्ता - बुधवार चौकापासून अलका चौकापर्यंत (सकाळी १० वाजल्यापासून बंद)
- गुरुनानक रस्ता - देवजीबाबा चौकापासून हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौकापर्यंत (सकाळी १० वाजल्यापासून बंद) abpmajha.in
- शास्त्री रस्ता - सेनदत्त पोलीस चौक पासून अलका चौकापर्यंत (दुपारी १२ वाजल्यापासून बंद)
- पुण्यातील पुढील मार्ग उद्या दुपारी ४ वाजेनंतर विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद राहतील.
- जंगली महाराज रस्ता - झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक
- कर्वे रस्ता - नळ स्टॉप चौकापासून खंडुजीबाबा चौक
- फर्ग्युसन रस्ता - खंडुजीबाब चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत
- भांडारकर रस्ता - पीवायसी जिमखान्यापासून गुडलक चौक ते नटराज चौकापर्यंत
- पुणे-सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक
- सोलापूर रस्ता - सेव्हन लव चौक ते जेधे चौक
- प्रभात रस्ता - डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक
- नेहरु रस्ता - अस्परा टॉकिज जवळील प्रिन्स हॉटेलपर्यंत
- मित्रमंडळ ते सावरकर रस्ता - चिमाजी अप्पा कॅनलपासून मित्रमंडळ चौकापर्यंत (पाटील प्लाझाच्या डाव्या बाजूला), सिंहगड रस्त्यावरून येणारी वाहने सावरकर पुतळा ते पेशवे पार्क दरम्यान सारसबागेच्या बाजूला लावता येणार आहेत.
- आरटीओ ऑफिस (संगमवाडी पूलाजवळील विसर्जन घाट - सीआयडी ऑफिस ते आरटीओ रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने लावता येतील. एसएसपीएसएस मैदानाच्या बाहेरही वाहने लावता येतील.
- आबासाहेब गरवारे कॉलेज जवळ - ठोसरबागेच्या जवळ आणि आबासाहेब गरवारे कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजेच पुणे सेन्ट्रल मॉलच्या जवळ आतल्याबाजूला वाहने लावता येतील.
- बाबा भिडे पूल - भिडे पूलाला जोडणारे काही रस्ते पाच सप्टेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून व काही रस्ते १२ वाजेपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत. तरी आपल्या सोयीनुसार भिडे पुलावरील नदीपात्रातील रस्त्यावर दोन्ही बाजूला लावता येतील. इथे वाहने लावताना एकेरी वाहनतळ ठेवण्यात आल्याने दुहेरी वाहने पार्क करू नयेत अशा स्पष्ट सूचना पुणे परिवहन विभागाने दिल्या आहेत.
- abpmajha.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement