एक्स्प्लोर
FTII: मुदतीआधीच गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ संपला!
पुणे: प्रचंड वादात फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इनस्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले गजेंद्र चौहान यांना मुदतीआधीच पायउतार व्हावं लागत आहे.
सरकारने मुदतीआधीच कार्यकाळ संपल्याचं जाहीर केल्याने, गजेंद्र चौहान आणि त्यांच्यासोबत संपूर्ण संचालक मंडळालाच पायउतार व्हावं लागणार आहे.
खरं तर गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. परंतु गजेंद्र चौहान यांच्या आधी दीड वर्ष एफटीआयआयच्या संचालकपदी कोणाचीच नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे रिक्त गेलेली दीड वर्ष चौहान यांच्या कारकिर्दीत पकडण्यात आली. त्यामुळे चौहान यांना प्रत्यक्षात सव्वा ते दीड वर्षांचाच कार्यकाळ मिळाला. त्यातही चौहान फक्त एकदा एफटीआयआयमध्ये आले होते. 7 जानेवारी 2016 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता.
त्यामुळे चौहान यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून केंद्र सरकारने काय मिळवलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यामुळे मोठं महाभारत घडलं होतं. चौहान यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी शंभरहून अधिक दिवस उपोषण केलं होतं. गजेंद्र चौहान यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केलं. परंतु या कशालाही न जुमानता केंद्र सरकारने चौहान यांची नियुक्ती कायम ठेवली होती.
मात्र आता मुदतीआधीच गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ संपल्याचं सरकारने जाहीर केल्याने, गजेंद्र चौहान आणि त्यांच्यासोबत संपूर्ण संचालक मंडळालाच पायउतार व्हावं लागणार आहे.
विद्यार्थ्यांचा आरोप काय होता?
गजेंद्र चौहानांना अध्यक्षपदी नियुक्त करुन केंद्र सरकार संस्थेत हस्तक्षेप करत आहे. शिवाय चौहान यांच्या व्यतिरिक्त अनेक पात्र व्यक्तींना निवडीत डावलंल गेलं, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल 139 दिवस संपही केला होता.
काय होता वाद?
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला होता. गजेंद्र चौहान यांची प्रतिमा आणि दूरदृष्टी एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी साजेशी नाही आणि राजकीय वजनामुळे त्यांची निवड झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.
गजेंद्र चौहानांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही,अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे एफटीआयच्या अध्यक्षपदी गीतकार गुलझार, दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अधूर गोपालकृष्णन यांची नावंही चर्चेत होती. मात्र त्या सगळ्यांना मागे टाकत गजेंद्र चौहान यांच्या नावावर माहिती आणि प्रसारण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने हा वाद उफाळला होता.
कोण आहेत गजेंद्र चौहान?
महाभारतात युधिष्ठीरची भूमिका निभावणारे गजेंद्र चौहान भाजप पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक होते. शिवाय अनेक मालिकातून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत.
संबंधित बातम्या
अखेर गजेंद्र चौहान FTIIच्या अध्यक्षपदी विराजमान
FTII वाद : गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावरुन हटवून राजू हिराणींची वर्णी?
FTIIच्या आंदोलनाला नवं वळण, विद्यार्थ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा
FTII वाद : तिढा सोडवण्यासाठी केंद्राचं पथक पुण्यात
FTII वाद: मोदीजी, विद्यार्थी गुन्हेगार नाहीत, राहुल गांधींचा निशाणा
एफटीआयआयच्या पाच विद्यार्थ्यांना अटक, डेक्कन पोलिसांची मध्यरात्री कारवाई
FTII च्या विद्यार्थ्यांचं जंतरमंतरवर आंदोलन, गजेंद्र चौहानांच्या निवडीविरोधात संसदेवर मोर्चा
गजेंद्र चौहान यांना विरोध करणारे हिंदूविरोधी : संघ
'बजरंगी भाईजान' FTII च्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी; गजेंद्र चौहानांनी राजीनामा द्यावा, सलमानचा सल्ला
आंदोलन सुरूच राहणार, FTII च्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला ठणकावलं
आंदोलन थांबवा, अन्यथा कठोर कारवाई करू, FTII च्या विद्यार्थ्यांना नोटीस
गजेंद्र चौहानांविरोधात बॉलिवूडमधून आवाज; ऋषी कपूर, अनुपम खेर विद्यार्थ्यांच्या पाठीशी
FTII बंद की मुंबईला हलवणार? माहिती प्रसारण खात्याच्या सूचनेनं नव्या वादाला तोंड
FTII च्या मुलांवर अन्याय होतोय, अभिनेत्री पल्लवी जोशींची टीका; संचालकपदाचाही राजीनामा
'एफटीआयआय'च्या वादात 'आप'ची उडी, कॅम्पसमध्ये भाजपविरोधात निदर्शने
'युधिष्ठिर' विरोधात 'यादवी', गजेंद्र चौहान यांच्या विरोधात योगेंद्र यादवांची निदर्शनं
FTIIमध्ये 'महाभारत', अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहानांची नियुक्ती, विद्यार्थी आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement