एक्स्प्लोर
गडचिरोलीत वसतिगृहात झोपलेल्या मुलांना साप चावला, दोघांचा मृत्यू
ही मुलं काल रात्री जमिनीवर झोपली होती. त्यावेळीच त्यांना साप चावला आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलाच्या तोंडातून फेस येत असल्याचं पाहून इतर मुलांनी त्याला रुग्णालयात नेलं.

प्रातिनिधीक फोटो
गडचिरोली : गडचिरोलीत एका खासगी वसतिगृहात स्पर्शदंशामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलावर उपचार सुरु आहेत. चार्मोशी तालुक्यातील वायगावमध्ये असलेल्या खासगी वसतिगृहात ही घटना घडली.
ही मुलं काल रात्री जमिनीवर झोपली होती. त्यावेळीच त्यांना साप चावला आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलाच्या तोंडातून फेस येत असल्याचं पाहून इतर मुलांनी त्याला रुग्णालयात नेलं. त्याच्यावर चंद्रपूरमधे उपचार सुरु आहेत
या वसतिगृहात नववी आणि दहावीची मुलं शिकतात. मृत मुलं ही 15 ते 16 वर्ष वयोगटातील असून ते नववीत शिकत होते. अतुल कुद्रपपवार आणि रितीक गुडी अशी मृतांची नावं आहेत.
तर धम्मदीप रामटेके या दहावीच्या मुलाला उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























